हिंगोली : सुरळीत वीजपुरवठ्यासाठी संतप्त शाळकरी मुलांचे आंदोलन

हिंगोली : सुरळीत वीजपुरवठ्यासाठी संतप्त शाळकरी मुलांचे आंदोलन

गोरेगाव (हिंगोली), पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील सुरजखेडा येथे सुरळीत वीजपुरवठा सुरू करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांसह शाळकरी मुले, महिला वीज वितरण कंपनीच्या विरोधात विद्युत मनोऱ्यावर चढुन सामुहिक आत्महत्येचा इशारा मुख्यकार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला होता. उपमुख्यकार्यकारी अभियंता यांनी शेतकऱ्याशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत आंदोलन मागे घेण्यात आले असुन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी लेखी स्वरूपात याबाबत माहिती दिली.

सुरजखेडा गेल्या अनेक वर्षापासुन शेतकऱ्यांना वीज प्रश्न उद्‌भवत आहे. कडोळी येथुन सुरजखेडा येथे वीजपुरवठा व्यवस्थीत होत नसल्याने रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. सुरजखेडा येथे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात लेखी स्वरूपात न्यायाच्या मागणीसाठी वीज पुरवठा सुरळीतपणे सुरू करावा अन्यथा दि. २९ रोजी कोळसा येथुन येणाऱ्या वीज मनोऱ्यांवर चढून सामुहिक आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता.

वीज वितरण कंपनीने निवेदनाची दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ दि २९ रोजी संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या मनोऱ्यांवर चढून सामुहिक आत्मदहन करण्याचा निर्णय घेत, दिवसभर आंदोलनाची धग कायम होती. दुपार नंतर वीज वितरण कंपनीचे उपमुख्यकार्यकारी अभियंता यांनी आंदोलन स्थळी भेट घेत शेतकऱ्यांशी चर्चा करून मागण्या मान्य केल्‍या. गोरेगाव ३३ केव्ही केंद्रातुन वीजपुरवठा सुरळीत चालू करण्याचे आश्वासन दिले. यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. त्‍यामूळे शेतक-यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news