नगर; कामरगाव घाटात भीषण अपघात, कंटेनर रस्त्यावरच उलटला; एसटी दरीत कोसळताना सुवै | पुढारी

नगर; कामरगाव घाटात भीषण अपघात, कंटेनर रस्त्यावरच उलटला; एसटी दरीत कोसळताना सुवै

वाळकी, पुढारी वृत्तसेवा: नगर-पुणे महामार्गावर कामरगाव येथील घाटात नगरहून पुण्याकडे चाललेल्या एसटी बस व कंटेनरचा सोमवारी (दि.२८) दुपारी १.१० च्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात कंटेनर रस्त्यावर उलटला, तर एसटी बस सुदैवाने दरीत कोसळण्यापासून वाचली. या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला असून, बसमधील १४ ते १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी (दि. २८) दुपारी नगरहून पुण्याकडे चाललेल्या कंटेनर चालकाचा कामरगाव घाटात उतारावर वाहनावरील ताबा सुटल्याने तो रस्त्यावरच उलटला. त्याच्या पाठीमागून रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड आगाराची एसटी बस (क्र.एम.एच.२०, बी.एल. २००९) जात होती. कंटेनर रस्त्यावर उलटल्याने बस चालकही गडबडून गेला व त्याने बसचा वेग नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उतारावर वेग नियंत्रणात आणण्यात त्याला यश आले नाही. त्यामुळे बसची कंटेनरला धडक बसली व बस रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या खड्ड्याकडे गेली. मात्र, देव बलवत्तर म्हणून रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडाला ती बस अडकल्याने ती खोल खड्ड्यात पडण्यापासून बचावली. या बसमध्ये ५ ते ६ महिला, लहान मुले व १० ते १२ पुरुष असे प्रवास करत होते. बस खड्ड्यात कोसळण्यापासून वाचल्याने सर्वांचे प्राण बचावले. या अपघातात कंटेनरचालक अशोक ढगे (वय ३६, रा. सोलापूर) गंभीररित्या जखमी झाला आहे.

मृत्युंजयदूत धावला मदतीला

या अपघाताची माहिती मिळताच कामरगाव परिसरात मृत्युंजय दूत पुरुष असे म्हणून काम करणाऱ्या सिद्धांत आंधळे या युवकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत, अपघातग्रस्त वाहनातील जखमींना बाहेर काढले. रुग्णवाहिका बोलावून गंभीर जखमी असलेल्या कंटेनर चालकाला नगरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. बसमधील भयभीत झालेल्या प्रवाशांनाही धीर देत त्यांनाही दुसऱ्या वाहनातून उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. त्याला रमजान शेख जय आंधळे यांनीही मदत केली. त्याच वेळी महामार्गा पोलिसांशी संपर्क साधून त्यांना अपघात माहिती

थोडयाच वेळात महामार्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गिरी यांनी घटनास्थळी पथक पाठविले. मृत्युंजयदूत सिद्धांत आंधळे व या पथकाने अपघातग्रस्त वाहने बाजूला करत महामार्गावरील वाहतूक अवघ्या अर्ध्या तासातच सुरळीत केली.

Back to top button