

औंढा नागनाथ; पुढारी वृत्तसेवा : उद्यापासून (दि.२१) सुरू होत असलेली बारावीची परीक्षा औंढा तालुक्यात सहा परीक्षा केंद्रावर होणार आहे. तालुक्यातील सहा केंद्रावर एकुण १ हजार ७५५ विद्यार्थी परीक्षा देणार असून शिक्षण विभागाने परिक्षार्थींच्या संपूर्ण व्यवस्थेसाठी तयारी केली असल्याचे गट शिक्षण अधिकारी श्रीपाद पुराणिक यांनी सांगितले.
प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेऊन गैरप्रकारास आळा घालण्याच्या दृष्टीने वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत. तालुक्यातील रामदास आठवले विद्यालय माथा, बाराशिव, एम.आय.पी.जवळा बाजार, औंढा नागनाथ येथील नागनाथ कनिष्ठ विद्यालय, नागनाथ वरिष्ठ महाविद्यालय व नागेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय या सहा केंद्रावर परीक्षा पार पडणार आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण विभागाकडून खबरदारी घेतली जाणार असून यासाठी २०० पेक्षा जास्त कर्मचारी असल्याचे गटशिक्षणाधिकारी पुराणिक यांनी सांगितले.
हेही वाचा :