स्वत:च्या रक्ताने तयार केलेल्या पत्रात त्यांनी आपली व्यथा व्यक्त केली आहे. वाघासारखा जगनाथा शेतकऱ्याला स्वार्थी राजकारणामुळे प्राण्यासारखे मरण पत्करावे लागत आहे. शेतकऱ्यापुढे वीज, हमीभाव, सिंचन आरोग्य, शिक्षण, मुले-मुलींचे विवाह असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यात शेतकऱ्याला कांदा रडवतो आहे. राजकारणी मात्र सत्ता संघर्षात धुंद आहेत. कांदा उत्पादकांचा कांदयाचा उत्पन्न खर्चही निघत नसून एकरी ५० हजार रू. तोटा सहन करावा लागत आहे. शेतकरी विरोधी सत्ताधारक भाजप सरकार यांचे मात्र सुलतानी कारभार सुरु आहेत. शेतकरीपुत्र असूनही आवाज उठवला जात नाही. शेतकऱ्यांसाठी कोणताही दौरा किंवा विशेष पुढाकार घेतला जात नाही. त्यामुळे रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्री यांच्याकडे विनंती करण्यात येत आहे की, "आपण काही करू शकत नसाल तर किमान मी ठेवलेल्या कांदा अग्नीडाग कार्यक्रमास आवर्जून हजर रहावे" असे आग्रहाचे निमंत्रण दिले. कृष्णा भगवान डोंगरे यांनी मागील वर्षी शेतात उभ्या कांद्याला पेटवून दिले होते. अनेक विरोधीपक्षनेते भेटी देऊन गेले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अर्धेनग्न अवस्थेत आंदोलनही केले. डोंगरे यांनी ह्या अग्नीडाग समारंभाच्या पत्रीका छापून त्या वितरीत केल्या आहेत.