पूर्णा-नांदेड रस्त्यावर अपघात, आठजण गंभीर जखमी

पूर्णा-नांदेड रस्त्यावर अपघात, आठजण गंभीर जखमी

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : पूर्णा ते नांदेड रस्त्यावर गुरुवारी (दि.२ जून) चुडावा गावाजवळ स्काॅर्पिओ गाडीचा ताबा सुटल्याने ती तीन ते चार वेळेस पलटी झाली. या अपघातात स्काॅर्पिओतील ८ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पूर्णा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. नांदेड शहराकडून पूर्णेकडे स्काॅर्पिओ (क्र.एम.एच. २३ एक्स १००८)  दहा ते अकरा प्रवाशांना घेऊन येत होती.

सकाळी अकराच्या सुमारास ही गाडी चुडावागावाजवळ आल्यानंतर भरधाव वेगात असताना कारच्या चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे कारने जवळपास तीन ते चार पलटी झाल्यामुळे या गाडीमध्ये बसलेले अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. नर्‍हापुर गावाजवळ शेतात काम करणार्‍या मजुरांनी आणि गावकर्‍यांनी अपघात घडल्यानंतर तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कारमधील सर्व गंभीर जखमींना बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच चुडावा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड यांनी घटनास्थळाला भेट देऊन जखमींना मदत केली. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यामध्ये एक गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. घटनेच्या अपघाताची चुडावा पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचलतं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news