विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी

शहरातील विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात असणारे फार्म हाऊस, मंगल कार्यालय येथील विवाह सोहळा तसेच अन्य सामाजिक कार्यक्रमामध्ये लेझर लाईटस, बीम लाईटसच्या वापरावर दि. १५ फेब्रुवारी ते १५ एप्रिल २०२६ पर्यंतच्या कालावधीसाठी बंदी घालण्यात आली आहे.
sambhajinagar news
विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदीFile Photo
Published on
Updated on

Use of lasers, beam lights banned in airport area

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा

शहरातील विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात असणारे फार्म हाऊस, मंगल कार्यालय येथील विवाह सोहळा तसेच अन्य सामाजिक कार्यक्रमामध्ये लेझर लाईटस, बीम लाईटसच्या वापरावर दि. १५ फेब्रुवारी ते १५ एप्रिल २०२६ पर्यंतच्या कालावधीसाठी बंदी घालण्यात आली आहे.

sambhajinagar news
Crime News : मूर्तिजापुरात चिमुरडीला पळवण्याचा प्रयत्न

भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम १६३ (१) व (३) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी जारी केले आहेत. यात म्हटले आहे की, पोलिस आयुक्तालय हद्दीतील सर्व फार्म हाऊस, मंगल कार्यालय, विवाह सो-हळा, सामाजिक कार्यक्रम इ. च्या आयोजक, मालक यांनी लेझर लाईट्स, बीम लाईट्स याचा वापर करू नये. कारण अशा वापर केल्यामुळे पायलटच्या दृष्यात अडथळा निर्माण होऊन लैंडिंग व टेकऑफ करण्यापूर्वी लक्ष विचलित होऊन दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

sambhajinagar news
दशमेश नगरमध्ये सोसायटीतील घराला आग

या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्यावर भारतीय न्याय संहितेचे कलम २२३ अन्वये व प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल व तो शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news