Crime News : मूर्तिजापुरात चिमुरडीला पळवण्याचा प्रयत्न

भिक्षा मागणाऱ्या तीन महिलांना जमावाने पकडले; गुन्हा दाखल
Crime News
Crime News : मूर्तिजापुरात चिमुरडीला पळवण्याचा प्रयत्नfile photo
Published on
Updated on

Attempt to kidnap a child in Murtijapur

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: भिक्षेकरी तीन महिलांना मूर्तिजापूर भागात चोरीच्या उद्देशाने फिरताना संतप्त नागरिकांनी पकडले. एका लहान मुलीचा हात धरून सोबत नेण्याचा प्रयत्न झाला. तिच्या गळ्यातील चेन ओढली. मुलीच्या आईने पाहताच आरडाओरड केल्याने जमावाने त्या तीन महिलांना पकडले. नगरसेवक मनोज गांगवे, दीपक खोतकर यांनी धाव घेत पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. ही घटना सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास मूर्तिजापूर, म्हाडा कॉलनीत घडली.

Crime News
उस्मानपुऱ्यात नळांना ड्रेनेज मिश्रित पाणी

नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मूर्तिजापूर, म्हाडा कॉलनी भागात सकाळी आठ पासून तीन ते चार महिला घरोघरी जाऊन भिक्षा मागत होत्या. त्यांनी दिवसभर सर्व परिसर पिंजून काढला. अनेक घरांमध्ये या महिलांनी शिरण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास एका १० वर्षीय मुलीने दारावर आलेल्या यातील एका महिलेला साबुदाणा खिचडी दिली.

तेव्हा तिने तुझ्या गळ्यातील चेन छान आहे, मला दे अशी मागणी केली. तिचा हात पकडून चल माझ्यासोबत म्हणत ओढू लागल्याने मुलीच्या आईने पहिले. तिने आरडाओरड केल्यानंतर तिथे कॉलनीतील महिला, नागरिक जमले. सर्वानी मिळून त्या तीन महिलांना पकडून ठेवले. त्यानंतर नगरसेवक मनोज गांगवे, दीपक खोतकर यांना कळविण्यात आले. त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

Crime News
संभाजीनगर विभागातील ऊस गाळप एक कोटी मेट्रिक टनांच्या उंबरठ्यावर

त्यानंतर एमआयडीसी सिडको पोलिसांचे वाहन तिथे पोहोचले. पोलिसांनी तीन महिलांना ताब्यात घेऊन ठाण्यात नेले. या महिला केंब्रिज भागातील मोकळ्या मैदानावर तंबू ठोकून राहत आहेत. त्या शहरातील विविध भागात दिवसभर घरोघरी जाऊन भिक्षा मागून उदर्निवाह करतात. त्यांच्यासोबत काही लहान मुलंही होती असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती, अशी माहिती पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली.

खेळणारी लहान मुले टार्गेट

या महिला रिक्षा करून मूर्तिजापूर भागात सकाळीच आल्या होत्या. भीक मागण्याच्या उद्देशाने भागात फिरत होत्या. अनेक घरांमध्ये यांनी डोकावले. बाहेर खेळणाऱ्या लहान मुलांच्या अंगावरील दागिने घेण्याचा प्रयत्न केला अशी माहिती नागरिकांनी दिल्याचे नगरसेवक मनोज गांगवे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news