Toyota new SUV : २०२९ मध्ये रस्त्यावर धावणार टोयोटाची नवीन एसयूव्ही कार

बिडकीन प्रकल्प : दरवर्षी होणार तब्बल १ लाख चारचाकींचे उत्पादन, २ लाख जणांना मिळणार रोजगार
Toyota new SUV
२०२९ मध्ये रस्त्यावर धावणार टोयोटाची नवीन एसयूव्ही कारpudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरातील बिडकीन औद्योगिक वसाहतीत सुरू होणाऱ्या टोयोटा किर्लोस्कर मोटर्स (टिकेएम) प्रकल्पातून २०२९ मध्ये प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात केली जाणार असून, दरवर्षी तब्बल १ लाख नवीन एसयूव्ही चारचाकींचे उत्पादन केले जाईल. २०२९ मध्येच पहिल्या सहा महिन्यांतच संभाजीनगरातील या प्रकल्पातून उत्पादित पहिली एसयूव्ही कार रस्त्यावर धावताना दिसेल, असे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, कंपनीकडूनही पोर्टलवर सोमवारी (दि.११) हे वृत्त जाहीर करण्यात आल्याने उद्योग जगतात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑरिक अंतर्गत शेंद्रा आणि बिडकीनमध्ये आतापर्यंत टोयोटा किर्लोस्करसह एथर एनर्जी, पिरामल, उनो मिंडो, लुब्रीझोल इंडिया, जेएसडब्ल्यू, एनएलके एनर्जी अशा बड्या उद्योगांनी प्रकल्पाची कामे सुरू केली आहेत.

Toyota new SUV
Chhatrapati Sambhajinagar | गेल इंडियाचीही संभाजीनगरला पसंती

पुढील काही वर्षात प्रत्यक्ष उत्पादन सुरू होऊन शहराचा चेहरा मोहरा यामुळे बदलणार आहे. यामुळे रोजगाराच्याही अनेक संधी उपलब्ध होणार असल्याने स्थानिक तरुणांमध्येही उत्साह संचारलेला आहे.

दरम्यान, टोयोटा किर्लोस्करने प्रत्यक्ष उत्पादनाचे वर्ष जाहीर केले असून, सोमवारी कंपनीने त्यांच्या पोर्टलवरून याची माहिती दिली. विडकीनमध्ये चारचाकी वाहन उत्पादनाचा प्रकल्प प्रगतिपथावर असून, २०२९ मध्ये पहिल्या सहा महिन्यात प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पातून १ लाख वाहनांचे दरवर्षी उत्पादन होणार असून, अंदाजे २ हजार ८०० जणांना रोजगार मिळणार आहे.

Toyota new SUV
Pratap Sarnaik : एस.टी. महामंडळाला मिळणार 'सोलर'मधून हजार कोटींचे उत्पन्न

असा आहे टोयोटाचा नवीन प्रकल्प

  • उत्पादन क्षेत्र-बिडकीन

  • प्रत्यक्ष उत्पादनाचे वर्ष- २०२९ मध्यापर्यंत

  • उत्पादनाची संख्या- १ लाख वाहन दरवर्षी

  • रोजगाराची संख्या- २ हजार ८०० अंदाजित

  • कामाचा प्रकार -स्टॅम्पिंग, वेल्डिंग, पेंटिंग, असेम्ब्ली

  • होणारे उत्पादन -नवी एसयूव्ही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news