पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांची विक्री करणाऱ्या तीन व्यापाऱ्यांना बेड्या

शहरात बंदी असलेल्या पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांची खुलेआम विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
sambhajinagar crime news
पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांची विक्री करणाऱ्या तीन व्यापाऱ्यांना बेड्याfile photo
Published on
Updated on

Three traders arrested for selling Pakistani cosmetics

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

शहरात बंदी असलेल्या पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांची खुलेआम विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिटी चौक पोलिसांनी रविवारी (दि.२९) शहागंज, रंगारगल्ली भागातील तीन दुकानांवर छापे टाकून सुमारे ६० हजारांचे पाकिस्तानी उत्पादने जप्त केली. याप्रकरणी ग्राहकांची आणि शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली तीन व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

sambhajinagar crime news
Parbhani News : गॅस रिफिलिंग, सुगंधी तंबाखू कारखान्यावर छापा

मोहम्मद अबरार मोहम्मद मसुयोद्दीन (२६, रा. नवाबपुरा), अंकुर अजय अग्रवाल (३५, रा. शहागंज) आणि जुमान खान मोहम्मद हनिफ खान (४८, रा. शहाबाजार) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तिघांना न्यायलयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनवाल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त रत्नाकर नवले यांनी सोमवारी (दि. ३०) दिली. दुकानांतून साबणासह एकूण २८ प्रकारच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

भारत सरकारने पाकिस्तानातून आयात होणाऱ्या 1. वस्तूंवर बंदी घातली आहे. मात्र, तरीही शहरात काही न, व्यापारी बेकायदेशीररीत्या कोणत्याही बिलाशिवाय (विना पावती) पाकिस्तानी क्रीम्स आणि साबणांची विक्री करत असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्यासह पीए सआय संजय राठोड, मुनीर पठाण, आनंद वाहूळ, प्रवीण टेकले, मनोहर त्रिभुवन, मंगेश पंडित यांच्या पथकाने रविवारी (दि. २९) तीन दुकानांवर छापे टाकून पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधने जप्त केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने गोरी मल्लिका, गोल्डन पर्ल, चांदनी, फेस फ्रेश आणि नूर हर्बल यांसारख्या बंदी असलेल्या उत्पादनांचा समावेश आहे.

sambhajinagar crime news
MD drugs seizure : मसनतपूर भागात एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

मुंबईमार्गे पाकिस्तानी मालाचे पार्सल

व्यापाऱ्यांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईमार्गे पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनाचे पार्सल शहरात आणले जात होते. गेल्या अनेक महिन्यांपासून जुन्या शहरात याची खुलेआम विक्री केली जात होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोलिसांना माहिती दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

या दुकानावर छापेमारी

१) हायलाईट कलेक्शन (घासमंडी, सिटी चौक)

- दुकान मालक मोहम्मद अबरार याच्याकडून मल्लिका, झलक, पारले, गोरी, गोल्डन पर्ल, फेस फ्रेश अशा विविध पाकिस्तानी ब्रँडच्या क्रीम्स आणि साबणांचा ५२,१८० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

२) ओम ट्रेडर्स (गांधी पुतळ्यामागे, शहागंज)

दुकान मालक अंकुर अग्रवाल याच्याकडून गोरी ब्युटी क्रीम आणि साबणांचा ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

३) फलक इम्पोरियम (सिटी सेंटर मॉल, शॉप नं.

१६, रंगारगल्ली) दुकान मालक जुमान खान

याच्याकडून गोरी आणि फेस फ्रेश साबण / क्रीम असा

१८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news