MD drugs seizure : मसनतपूर भागात एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

ठाण्याच्या इंजिनीअरसह साथीदाराला बेड्या, तब्बल २ किलो एमडी बनवण्याचा होता डाव !
MD drugs seizure
मसनतपूर भागात एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्तpudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : पत्र्याच्या शेडमध्ये कारखाना थाटून ड्रग्ज निर्मितीचा डाव अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने (एएनटीएफ) उधळून लावला. ही कारवाई सोमवारी (दि.१६) एमआयडीसी चिकलठाणा परिसरातील शहानगर, मसनतपूर भागात करण्यात आली.

पोलिसांनी दोघांना अटक केली असून, ६५ ग्रॅम एमडी, केमिकल्स असा सुमारे ४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींचा जप्त केमिकलद्वारे तब्बल २ किलो एमडी बनवण्याचा डाव असल्याचे समोर आले.

रोशन रवींद्र कदम (३२) आणि मयूर दीपक जाधव (२३, दोघेही रा. कोपरी, ठाणे ईस्ट) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दोघांना न्यायालयाने २३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी मंगळवारी (दि.१७) दिली.

MD drugs seizure
Sambhajinagar women and child hospital: चारशे बेडचे शिशू रुग्णालयाचे काम पूर्ण होऊनही लटकले

अधिक माहितीनुसार, मसनतपूर येथे गल्ली क्र. ५ येथील जावेद शेख यांच्या घरासमोरच्या मोकळ्या जागेत पत्र्याच्या शेडमध्ये बाहेरून आलेले दोघे एमडी ड्रग्ज, नशेचे पदार्थ तयार करत असल्याची माहिती एएनटीएफच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांना मिळाली होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास पथकाने छापा मारला. तिथे कदम आणि जाधव दोघे एमडी ड्रग्ज तयार डिस्टिलेशन प्रोसेसमध्ये गुंतलेले मिळून आले.

घटनास्थळावरून ६५ ग्रॅम एमडी ड्रग्ज, राऊंड बॉटम फ्लास्क, कंडेनसर, मिक्सर मशीन, प्लास्टिक ड्रम आणि कॅन, रसायनाच्या १२ बाटल्या आणि पावडर स्वरूपातील केमिकल्सचे ३ बॉक्स, ३ मोबाईल आणि ड्रग्ज निर्मितीचे इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई विशेष पोलिस महानिरीक्षक शारदा राऊत, पोलिस अधीक्षक अजित टिके, उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक गीता बागवडे, एपीआय विजय जगदाळे, दीपाली पाटील व त्यांच्या पथकाने केली.

बदलापूर कनेक्शन आणि ड्रग्जचा फॉर्म्युला

मुख्य आरोपी रोशन कदम याने केमिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा केलेला असून, तो पूर्वी बदलापूर येथील एका केमिकल कंपनीत कार्यरत होता. कंपनीतील कामाच्या अनुभवामुळे त्याला एमडी ड्रग्ज तयार करण्याचा रासायनिक फॉर्म्युला अवगत झाला. कंपनीतून बाहेर पडल्यानंतर त्याने झटपट पैशाच्या लालसेपोटी ड्रग्ज तयार करून विक्री करण्याचा मार्ग निवडला.

स्थानिक पेडलरच्या मदतीने कारखाना

रोशन हा छत्रपती संभाजीनगरमधील एका ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात आला होता. त्याने या पेडलरला शहरात एखादी सुरक्षित खोली भाड्याने घेऊन देण्यास सांगितले होते. स्वतः ड्रग्ज निर्मितीसाठी लागणारे सर्व रासायनिक घटक घेऊन तो शहरात दाखल झाला होता. मात्र त्याचा हा प्लॅन यशस्वी होण्यापूर्वीच पोलिसांनी तो उधळून लावला.

केमिकल लॅबचाच सेटअप

बाष्पीभवनासाठी चुलीवर अॅल्युमिनियमचे पातेले, काचेचे कंडेन्सर, मिक्सर ड्रिल मशीन आणि रसायनांचे ड्रम असा अद्ययावत केमिकल लॅवचाच सेटअप होता. जप्त कच्च्या मालातून तब्बल २ किलो एमडी ड्रग्ज तयार करण्याचा डाव होता. जर हे ड्रग्ज बाजारात पोहोचले असते, तर शहरातील हजारो तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असते. या ड्रग्ज रॅकेटची मुळे आणखी कुठे पसरली आहेत, याचा तपास एएनटीएफचे पथक करत आहे.

MD drugs seizure
Chatrapati Sambhajinagar : पादचारी रस्त्याचा राजा फक्त कागदावरच

दोन वर्षापूर्वी चोरीच्या गुन्ह्यात चौकशी

सूत्रांच्या माहितीनुसार, २०२४ मध्ये प्रा. लोंढे यांच्या घरात बनावट चावीने कुलूप उघडकून चोरीचा प्रयत्न झाला होता. त्यावरून उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात विशाल राठोडची पोलिसांनी चौकशी केली होती. मात्र, पुढे त्या गुन्ह्याचे काय झाले हे मात्र, समजू शकले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news