Fertilizer Booking System : खत बुकिंगच्या नव्या प्रणालीला स्थगिती द्या !

खासदार काळे, भुमरेंची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
Fertilizer Booking System
Fertilizer Booking System : खत बुकिंगच्या नव्या प्रणालीला स्थगिती द्या !file photo
Published on
Updated on

Suspend the new fertilizer booking system!

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेली 'फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल' ही मोबाईल-आधारित खत बुकिंग प्रणाली शेतकरी आणि खत विक्रेत्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर, या प्रणालीला चालू खरीप हंगाम संपेपर्यंत तात्पुरती स्थगिती द्यावी, अशी मागणी खासदार डॉ. कल्याण काळे आणि खासदार संदीपान भुमरे यांनी बुधवारी (दि. १७) केंद्रीय रसायन व खत मंत्री जे. पी. नड्डा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

Fertilizer Booking System
Fertilizer Purchase Scheme : खत खरेदी योजनेतील ऑनलाईन ॲप शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी

निवेदनात नमूद केल्यानुसार, ग्रामीण भागात सर्व्हर वारंवार डाऊन होणे, तांत्रिक त्रुटी निर्माण होणे आणि या डिजिटल प्रक्रियेचे पुरेशी माहिती व प्रशिक्षण नसल्याने शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रांवर नाहक फेऱ्या माराव्या लागत आहेत. सध्या खरीप हंगामाचा अत्यंत महत्त्वाचा काळ असल्याने शेतकऱ्यांना वेळेत खते मिळणे गरजेचे आहे.

Fertilizer Booking System
Jalna News : खरीप हंगाम पूर्वमशागत अंतिम टप्प्यात

त्यामुळे या प्रणालीतील सर्व व्यावहारिक अडचणी आणि तांत्रिक दोषांचा सखोल अभ्यास करून त्यात आवश्यक सुधारणा कराव्यात, तोपर्यंत ही प्रणाली स्थगित ठेवावी, अशी मागणी खासदारांनी केली आहे. केंद्रीय मंत्री नड्डा यांनी यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news