तहसीलदारांच्या दालनात शेतकऱ्याचा कुटुंबासह आत्महत्येचा प्रयत्न

२० वर्षांचा रस्ता बंद केल्याने संतप्त युवकाचे टोकाचे पाऊल; गंगापूर तहसील कार्यालयात खळबळ
तहसीलदारांच्या दालनात शेतकऱ्याचा कुटुंबासह आत्महत्येचा प्रयत्न
Published on
Updated on

गंगापूर : तालुक्यातील मंजूरपूर शिवारातील जुन्या वहिवाटीच्या रस्त्याच्या वादातून एका शेतकऱ्याने कुटुंबासह थेट तहसील कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.१९) दुपारी चारच्या सुमारास घडली. तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्या दालनात युवकाने अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याने काही काळ तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली. उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.

मंजूरपूर येथील दीपक भागीनाथ बोर्डे यांच्या घराकडे जाणारा गट नंबर १५ मधील सुमारे ९० वर्षांपासूनचा जुना वहिवाटीचा रस्ता काही व्यक्तींनी दगड व काटेरी बांबू टाकून बंद केल्याचा आरोप आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा मार्ग बंद असल्याने बोर्डे कुटुंबीयांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

तहसीलदारांच्या दालनात शेतकऱ्याचा कुटुंबासह आत्महत्येचा प्रयत्न
Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय बालकाचा मृत्यू

दीपक बोर्डे यांच्या वडिलांना अर्धांगवायूचा त्रास असून रस्ता नसल्याने त्यांना दवाखान्यात नेणेही कठीण झाले आहे. शेतीकडे जाण्याचा मार्ग बंद झाल्याने जमीन पडीक पडली असून मंजूर घरकुलाचे बांधकामही रखडले आहे. याबाबत डिसेंबर २०२५ पासून तहसील प्रशासनाकडे वारंवार अर्ज करूनही न्याय मिळत नसल्याचा आरोप बोर्डे यांनी केला आहे. रस्ता मागितल्यास मारहाण व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचाही त्यांनी आरोप केला.

तहसीलदारांच्या दालनात शेतकऱ्याचा कुटुंबासह आत्महत्येचा प्रयत्न
Bhandara Leopard Attack : धावत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला, युवक गंभीर जखमी; राजापूर येथील घटना

दरम्यान, वृद्ध आजीला उपचारासाठी नेत असताना खराब रस्त्यामुळे त्या दुचाकीवरून घसरून पडल्या आणि त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या बोर्डे कुटुंबीयांनी जखमी आजीला सोबत घेत थेट तहसील कार्यालय गाठले. तहसीलदारांच्या दालनात दीपक बोर्डे यांनी पेट्रोलची बाटली काढून अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. उपस्थित कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना बाजूला करत परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

तहसीलदारांच्या दालनात शेतकऱ्याचा कुटुंबासह आत्महत्येचा प्रयत्न
Thane leopard captured | अखेर 'तो' नरभक्षक बिबट्या जेरबंद

या घटनेनंतर तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी संबंधित पक्षांना समजावून सांगत रस्ता मोकळा करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणाची अंतिम सुनावणी २ जून रोजी होणार असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, “न्यायासाठी नागरिकांना जीव धोक्यात घालण्याची वेळ का येते?” असा सवाल उपस्थित होत असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news