एमआयएमच्या १४ नगरसेवकांच्या पदावर टांगती तलवार

शहागंज अतिक्रमण प्रकरण तापले : कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची मनपा आयुक्तांची माहिती
chhatrapati sambhajinagar municipal corporation / छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
Chhatrapati Sambhajinagar Muncipal corporation : मनपा कर्मचाऱ्यांना 3500 रुपये दिवाळी भेटPudhari News Network
Published on
Updated on

Shahaganj encroachment case heats up: Municipal Commissioner informs that the process of action is underway

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

शहागंज परिसरातील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईदरम्यान अडथळा आणल्याच्या प्रकरणात एमआयएमच्या १४ नगरसेवकांवर मनपा कायद्यानुसार पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी गुरुवारी (दि.५) पत्रकारांशी बोलताना दिली. या प्रकरणात नगरसेवकांसह त्यांच्या नातेवाईक व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

chhatrapati sambhajinagar municipal corporation / छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
अतिक्रमणाची माहिती देऊनही काढण्यासाठी लागले दोन वर्षे

यावेळी आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले की, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १०-अ नुसार नगर- सेवक शपथपत्रात कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी स्वीकारतात. कायद्याचे उल्लंघन झाल्यास पदमुक्त होण्याची तरतूद आहे.

त्यानुसार शहागंज येथील अतिक्रमण कारवाईदरम्यान काही नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अडथळा आणल्याची नोंद झाल्याने कलम १०, ११ आणि १२ अंतर्गत सुमारे ४० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

chhatrapati sambhajinagar municipal corporation / छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
महावितरणचे दुटप्पी धोरण, ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशन मोर्चा

यामध्ये नगरसेवकांसह त्यांचे भाऊ, पुत्र आणि इतर नातेवाइकांचा समावेश असल्याची माहिती देत पोलिसांकडून व्हिडिओ पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले. दरम्यान, विरोधी पक्षनेते समीर साजेद यांनी हा गुन्हा बनावट असल्याचा आरोप केला. तसेच शिंदे सेनेच्या दवावाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावाही समीर साजेद यांनी केला.

शहागंज घटनेपूर्वी आपण आयुक्तांशी चर्चा करूनच तेथे गेलो होतो, मात्र त्या वेळी अतिक्रमण कारवाई सुरू नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

...तर मी राजकारणातून संन्यास घेईन

शहागंज येथील हातगाडी कारवाईवेळी अधिकाऱ्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेता समीर साजेद यांनी फेटाळून लावला आहे. तसेच यावर जर असा व्हिडिओ दाखवला तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असे आव्हानही साजेद यांनी दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news