Sanjay Shirsat : घाटीतील आमूलाग्र बदलांचा मी साक्षीदार

कलंक पुसला : क्ष-किरण विभागात डिजिटल रेडिओग्राफीचे लोकार्पण
Sanjay Shirsat
Sanjay Shirsat : घाटीतील आमूलाग्र बदलांचा मी साक्षीदार File Photo
Published on
Updated on

Sanjay Shirsat: I am witnessing radical changes in the Ghati Hospital

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा घाटीत सर्वसामान्यांना खासगी रुग्णालयांप्रमाणे सोयीसुविधा आणि महागडे उपचार मिळत आहेत. आधीचा अस्वच्छतेचा कंलक पुसला जाऊन घाटीचा उल्लेखनीय आणि आनंददायी कालापालट झाला आहे. या आमूलाग्र बदलांचे आपणही साक्षीदार असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी (दि.२९) डिजिटल रेडीओग्राफीच्या लोकार्पणप्रसंगी काढले.

Sanjay Shirsat
Sambhajinagar News : मका खरेदी केंद्र बंद, शेतकरी आर्थिक कोंडीत

यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, शासकीय कर्करुग्णालयाचे ओएसडी डॉ. अरविंद गायकवाड, क्ष-किरण विभागप्रमुख डॉ. वर्षा रोटे-कागिनाळकर, डॉ. अजय वरे, उपाधिष्ठाता डॉ. गायत्री तडवळकर, ओएसडी डॉ. सुरेश हरबडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुचेता जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. क्ष-किरण विभागात दाखल नवीन अत्याधुनिक डीआर (डिजिटल रेडिओग्राफी) मशीनचे पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते शनिवारी लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री म्हणाले, खासगी रुग्णालयात बेड मिळत नाही, असे फोन दररोज येतात.

मी त्यांना सरळ घाटीत जा असे सांगतो. इथे खासगी हॉस्पिटलप्रमाणे अत्याधुनिक यंत्रसामग्री, महागडे उपचार उपलब्ध आहेत. यापुढेही जाऊन खासगी हॉस्पिटलमध्ये नसतील अशा सुविधा घाटी रुग्णालयात उपलब्ध झाल्या पाहिजे. डॉक्टरही टेन्शन फी राहयला हवे, त्यासाठी आवश्यक सोयीसुविधा आणि यंत्रसामग्रीसाठी निधीची चिंता नसावी, मागील दहा वर्षांत घाटीला सर्वाधिक निधी दिला आहे. यापुढेही देऊ. मार्चमध्ये नवीन सिटीस्कॅन मशीनही घाटीला मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Sanjay Shirsat
Shendra MIDC : एमआयडीसीत दिव्याखाली अंधार, तक्रार करायची कुठे ?

काम करतात, त्यांच्यासमोरच अडचणी

प्रत्येक गरजू रुग्णांना वेळीच, दर्जेदार उपचार मिळावे, यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. परंतु काही अडचणी निर्माण केल्या जात आहेत. अशी खंत अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी व्यक्त केली. तेव्हा, तुम्ही चांगले काम करत आहात. त्यामुळे चिंता नको, काम करतात त्यांच्यासमोरच अडचणी येतात. त्याकडे दुर्लक्ष करा. असा कानमंत्र पालकमंत्रींनी डॉ. सुक्रैना दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news