Shendra MIDC : एमआयडीसीत दिव्याखाली अंधार, तक्रार करायची कुठे ?

तरी, ना तक्रारकेंद्र.. ना साधे ऑफिस..
Shendra MIDC
Shendra MIDC : एमआयडीसीत दिव्याखाली अंधार, तक्रार करायची कुठे ?File Photo
Published on
Updated on

Sambhajinagar Administrative inefficiency in five-star Shendra MIDC

राहुल जांगडे

छत्रपती संभाजीनगरः पंचतारांकित शेंद्रा एमआयडीसीत प्रशासकीय अकार्यक्षमतेमुळे ठेकेदारांची मनमानी सुरू आहे. या औद्योगिक क्षेत्रातील पथदिवे दुरुस्तीसाठी ठेकेदाराने लाखोंचे कंत्राट घेतले. मात्र, ना ऑफिस, ना मदतकेंद्र उभारले. हे कमी की काय साधा हेल्पलाइननंबरची सुविधाही उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे तक्रारींसाठी उद्योजकांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहे. एवढे होऊनही तक्रारींचे महिनोमहिने निवारण होत नसल्याने एमआयडीसीत दिव्याखाली अंधार असा भोंगळ कारभार सुरू आहे.

Shendra MIDC
Robbery News : पोखरीत एकाच रात्री सात ठिकाणी जबरी चोरी

शेंद्रा एमआयडीसीत लहान-मोठ्या एक हजाराहून अधिक उद्योगांसाठी २००० लाईट्स, ११०० फिटिंग आणि ८५० पोल आहेत. हे पथदिवे चालू ठेवण्यासाठी दरवर्षी २७ लाखांचे टेंडर काढले जाते. गतवर्षी असंसो लाईट्स यांना कंत्राट देण्यात आले होते. दुरुस्तीच्या नावाने त्यांनी वर्षभर कागदोपत्री दिवे लावले. येथील ए सेक्टर, बी सेक्टर, डी ब्लॉक, सी ब्लॉक, फूट पार्कसह अनेक अंतर्गत रस्त्यांवरील बहुतांश पथदिवे बंद आहेत. ५ नोव्हेंबरपासून पथदिवे दुरुस्तीचे कंत्राट घेतलेल्या बिटा इलेक्ट्रिकल यांनीही मागील २४ दिवसांत किती पथदिवे बंद याची साधी पाहणी केलेली नाही. इतकेच काय एमआयडीसीत साधे तक्रार केंद्रही सुरू केलेले नाही. याकडे नाही.

अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत असल्याने बहुतांश बंद पथदिवे अद्यापही सुरू होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे उद्योजक, कामगारांचा त्रास कमी झालेला नाही.

Shendra MIDC
Sambhajinagar News : मका खरेदी केंद्र बंद, शेतकरी आर्थिक कोंडीत

पथदिव्यासंबंधी तक्रारीसाठी मदतकेंद्र वा हेल्पलाइन नंबर नसल्याने अनेक उद्योजकांना कुठे तक्रार करावी है समजत नाही. अनेकजण वीज कंपनीकडे धाव घेतात. परंतु आमचा संबंध नाही, असे उत्तर मिळते. एमआयडीसीकडूनही कंत्राट दिल्याने तुम्ही ठेकेदाराकडे जा असे सांगितले जाते. यावरही उद्योजकांचे हेलपाटे थांबत नाही. अनेक प्रयत्नानंतर ठेकेदारांशी संपर्क होतो. मग येतो, बघतो, सांगतोच्या आश्वासनानंतर एखाद्या कर्मचाऱ्यांचा नंबर दिला जातो. यानंतरही दुरुस्तीचे काम लवकर होत नाही, असे उद्योजकांनी सांगितले.तक्रार करावी कुठे हेच कळत नाही.

पथदिव्यांविषयी कुठे तक्रार करावी हे अनेक उद्योजकांना समजत नाही. त्यात केलेल्या तक्रारींचे निवारणही होत नाही. तोंडी तक्रारींकडे तर साफ दुर्लक्ष केले जाते.
-मनोज राजपूत, उद्योजक
नाहक चकरा माराव्या लागतात उद्योगांना पथदिव्यांची सुविधा देणे ही एमआयडीसीची जबाबदारी आहे. तसेच यासंदर्भात तक्रारीसाठी उद्य-ोजकांना वारंवार ऑफिसच्या नाहक चकरा माराव्या लागतात. हेल्पलाइन नंबर वा तिथेच तक्रार केंद्र झाल्यास हेलपाटे थांबतील.
-अर्जुन गायकवाड, अध्यक्ष, मसिआ.
हेल्पलाइन नंबर द्यावा पथदिवेसंदर्भात तक्रारीसाठी एमआयडीसीने वा ठेकेदाराने एखादा हेल्पलाइन नंबर द्यावा, प्रत्येक सेक्टरमध्ये खांबावर किंवा कंपनींच्या बाहेर हे नंबर लावावेत. जेणेकरून उद्योजकांची गैरसोय थांबेल.
- प्रमोद देवकर, उद्योजक
तक्रार करावी कुठे हेच कळत नाही पथदिव्यांविषयी कुठे तक्रार करावी हे अनेक उद्योजकांना समजत नाही. त्यात केलेल्या तक्रारींचे निवारणही होत नाही. तोंडी तक्रारींकडे तर साफ दुर्लक्ष केले जाते.
-मनोज राजपूत, उद्योजक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news