आघाडी-पिछाडीच्या खेळात समर्थकांची धावपळ

तंत्रनिकेतनच्या केंद्रावर कडेकोट पोलिस बंदोबस्तात मतमोजणी
sambhajinagar zp election result
आघाडी-पिछाडीच्या खेळात समर्थकांची धावपळfile photo
Published on
Updated on

sambhajinagar zp election result

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

छत्रपती संभाजीनगर तालुक्याच्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान उस्मानपुरा येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयासमोर परिसरात सोमवारी (दि.९) सकाळपासूनच राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळाले. कार्यालयासमोर उमेदवार व समर्थकांची सकाळी नऊ वाजेपासून मोठी गर्दी झाली होती. दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होताच प्रत्येक फेरीसोबत उत्सुकता शिगेला पोहोचली.

sambhajinagar zp election result
उबाठाच्या ठोंबरे यांचा विजयाचा चौकार

पहिल्या फेरीचा निकाल जाहीर होताच आघाडीवर असलेल्या उमेदवाराच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष केला. मात्र पुढील फेरीत चित्र बदलताच विरोधी गटाने घोषणा देत वातावरण ढवळून काढले. आघाडी-पिछाडीचा हा खेळ सुमारे २१ ते २२ फेऱ्यांपर्यंत सुरू राहिल्याने समर्थकांची धावपळ आणि तणाव वाढला होता.

प्रत्येक फेरीत मतांचे चढ-उतार होत असल्याने समर्थकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि निर-ाशेचे मिश्र भाव दिसत होते. २२व्या फेरीनंतर निकालाचा कल स्पष्ट झाल्यानंतर पराभव निश्चित झालेल्या उमेदवारांच्या समर्थकांनी हळूहळू परिसरातून काढता पाय घेतला.

sambhajinagar zp election result
जि. प. मध्ये एमआयएमची हवा गुल

तर विजयी उमेदवाराच्या समर्थकांमध्ये जल्ल-ोषाचे वातावरण पसरले. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. महाविद्यालयाच्या डाव्या बाजूस गाढे चौकापासून तर उजव्या बाजूस देवगिरी महाविद्यालयाच्या गेटपासून बॅरिकेटिंग करण्यात आली होती.

प्रवेशावर नियंत्रण ठेवत पोलिसांकडून सातत्याने देखरेख ठेवण्यात आली. किरकोळ शाब्दिक वाद सोडल्यास संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news