जि. प. मध्ये एमआयएमची हवा गुल

गट-गणांतील २१ उमेदवार पराभूत, जलील यांच्या सभांचा करिश्मा नाही
Zilla Parishad election campaign
जि. प. मध्ये एमआयएमची हवा गुलfile photo
Published on
Updated on

21 MIM candidates from various groups defeated

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेत एमआयएमला गेल्यावेळीपेक्षा तब्बल ९ अतिरिक्त नगरसेवक निवडून आणण्यात यश आले. त्यामुळे या यशाच्या जोरदावर एमआयएमने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीतही नशीब अजमावण्याचा प्रयत्न करीत ५ गट आणि १६ गणांत उमेदवार दिले. मात्र या २१ उमेदवारांपैकी एकही उमेदवार निवडून आणण्यात एमआयएमला यश आले नाही. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या अनेक सभा झाल्या, परंतु त्यांच्या सभांचा करिश्मा चालला नाही.

Zilla Parishad election campaign
मनपानंतर जि.प.तही भाजपचाच करिश्मा

महापालिकेच्या निवडणुकीत यंदाही एमआयएमला मुस्लिम मतदारांनी पहिली पसंदी दिली. या मतदारांच्या जोरावर सर्वच मुस्लिमबहुल प्रभागांमध्ये सर्वाधिक मतदाधिक्याने एमआयएमचे उमेदवार विजयी झाले. मुस्लिम मत एमआयएम वगळता कुठेही जाणार नाही, हे गृहीत धरूनच महापालिकेच्या तब्बल १२ जागांवर एमआयएमने अचूकपणे मत विभाजनाच्या समीकरणवर यश मिळविले. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना मतांचे विभाजन कसे आणि कुठे होऊ शकते, हे चांगल्या प्रकारे माहिती आहे.

त्यामुळेच त्यांनी पहिली विधानसभा आणि त्यानंतर लोकसभा निवडणूक लढवून यश मिळविले होते. यंदाही तशीच जादू त्यांनी लोकसभा आणि विधानसभेत करण्याचा प्रयत्न केला, परंतु थोडक्यात त्यांना अपयश आले. दरम्यान, मत विभाजनाचे हे समीकरण त्यांना महापालिकेच्या निवडणुकीत चांगलेच लाभदायक ठरले.

Zilla Parishad election campaign
उबाठाच्या ठोंबरे यांचा विजयाचा चौकार

गुलमंडीसह १२ नगरसेवक याच समीकरणावर विजयी झाले. त्यात दलित वसाहतीतील मत विभाजनाचा सर्वाधिक यश देणारे ठरले. याच मत विभाजनाच्या जोरावर एमआयएमने जिल्हा परिषदेच्या ५ गटात आणि पंचायत समितीच्या १६ गणांमध्ये एकही उमेदवार निवडून आला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news