Sambhajinagar News : नगरसेवक मतीन पटेलचा 'तो' व्हिडिओ पुन्हा व्हायरल

पीडितेची पोलिस आयुक्तांकडे तक्रार, मात्र पोलिस ठाण्यात न गेल्याने गुन्हा टळला होता
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

Sambhajinagar News: Corporator Matin Patel's 'That' Video Goes Viral Again

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा नाशिकच्या बहुचर्चित टीसीएस लव्ह जिहाद प्रकरणातील मुख्य आर-ोपी निदा खान हिला आश्रय दिल्याप्रकरणी आधीच पोलिसांच्या रडारवर असलेले एमआयएमचे नारेगावचे नगरसेवक मतीन मजीद शेख ऊर्फ मतीन पटेल आणखी एका प्रकरणाने पुन्हा चर्चेत आले आहेत.

Crime News
Chhatrapati Sambhajinagar | अल्पवयीन लुटारू...चेनस्नॅचिंग..शहरात रात्रीचा थरार! नागरिक दहशतीत

मनपा निवडणुकीच्या काळात व्हायरल झालेला आपला एक अश्लील व्हिडिओ एआय तंत्रज्ञानाने मॉर्फ केलेला असल्याचा दावा केला होता. मात्र, तो व्हिडिओ खरा असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात न्यायालयात ब समरी अहवाल दाखल केल्याने तो व्हिडीओ मॉर्फ नव्हता याला पुष्टी मिळाली आहे. विशेष म्हणजे, स्वतः पीडित महिलेनेच पोलिस आयुक्तांकडे तक्रार अर्ज देऊन मतीनने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा व व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप केला होता. मात्र, बदनामीच्या भीतीने पीडिता अधिकृत तक्रारीसाठी पोलिस ठाण्यात न गेल्याने मतीनवर गुन्हा दाखल होऊ शकलेला नाही असे सूत्रांनी सांगितले.

अधिक माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी मनपा निवडणुकीच्या धामधुमीत मतीन पटेल यांचा एका महिलेसोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ तौफिक कुरेशी याने एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल केला होता. तेव्हा आपले राजकीय नुकसान टाळण्यासाठी मतीन पटेल यांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात धाव घेतली.

Crime News
Nida Khan arrested TCS case : नगरसेवक मतीन पटेलला सोबत घेऊनच रात्री फ्लॅटवर टाकली धाड

माझी बदनामी करण्यासाठी विरोधकांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून हा मॉर्फ केलेला खोटा व्हिडिओ बनवला आहे, अशी तक्रार त्यांनी दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी तेव्हा तौफिक कुरेशीवर गुन्हाही दाखल केला होता. मात्र या गुन्ह्याचा तपास करून गेल्याच महिन्यात पोलिसांनी न्यायालयात व समरी अहवाल सादर केल्याने तो व्हिडीओ प्राथमिकदृष्ट्या मॉर्फ नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

जप्त मोबाईल ठरणार मुख्य पुरावा

गुन्हेगाराला आश्रय देण्याच्या ताज्या प्रकरणात पोलिसांनी मतीन पटेल यांचा मोबाईल जप्त केला आहे. हाच मोबाईल आता या लैंगिक शोषणाच्या आणि एआयच्या खोट्या बनावाच्या तपासातील मुख्य पुरावा ठरू शकतो. या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी झाल्यास, पीडितेचे रेकॉर्ड केलेले व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागण्याची दाट शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

पीडितेच्या अर्जातील धक्कादायक खुलासे

या सगळ्या प्रकारादरम्यान, १४ जानेवारी रोजी स्वतः पीडितेने पोलिस आयुक्तांना तक्रार अर्ज दिला होता. मतीन पटेल याने प्रेमसंबंध निर्माण करून आणि लग्नाचे आमिष दाखवून तिला अनेकदा खोलीवर बोलावून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याचे मतीनने गुपचूप रेकॉर्डिंग केले. तसेच व्हिडिओ कॉलवर तिला विवस्त्र होण्यास सांगून त्याचेही चित्रीकरण करून ठेवले.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पीडितेचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी, शारीरिक रचनेवरून तिच्या पतीने तिला ओळखले असून, ही बाब पतीला समजली आहे. मतीनच्या मोबाईलमध्ये असे अनेक व्हिडिओ असून, तो ते व्हायरल करून आपली बदनामी करू शकतो. त्यामुळे त्याचा मोबाईल जप्त करून ते व्हिडिओ डिलीट करावेत आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी तिने या अर्जात केली होती. मात्र, पुढे पीडिता बदनामीच्या भीतीने पोलिस ठाण्यात न गेल्याने याप्रकरणात गुन्हा दाखल झाला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news