पैठण, पुढारी वृत्तसेवा: पैठण तालुक्यात गेल्या दोन दिवसांत धुवाँधार पाऊस झाला आहे. शनिवारी (दि.२३) रात्री झालेल्या पावसामुळे पैठण शहरात अनेक वसाहतीमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली, अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराविरूद्ध नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा
आज (दि.२४) सकाळी नाथसागर धरणाची पाणी पातळी १५०७.७८ फुटामध्ये आहे. पाण्याची टक्केवारी ३६.३५ चिंताजनक आहे. सध्या वरील धरणातून १९ हजार क्युसेक पाण्याचे आवक सुरू आहे. मागील वर्षी याच तारखेला २१५४. २१८ फूट इतकी पाणीपातळी होती. तर ९९.२३ टक्के पाणी पातळीची नोंद झाली होती, असे नाथसागर धरणाचे उपअभियंता विजय काकडे यांनी दिली.
तालुक्यातील विविध गावांमध्ये २५ ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू असल्याची माहिती गटविकास अधिकारी उषा मोरे यांनी दिली आहे.