छ. संभाजीनगर: पावसाने दडी मारल्याने एक लाख हेक्टरवरील पिके करपली; बळीराजा चिंतातूर | पुढारी

छ. संभाजीनगर: पावसाने दडी मारल्याने एक लाख हेक्टरवरील पिके करपली; बळीराजा चिंतातूर

मुनीर पठाण

अजिंठा: सिल्लोड तालुक्यातील अजिंठा, आनाड, मुखपाट, बाळापूर, पिंपळदरी, शिवणा, गोळेगावसह परिसरामध्ये पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जोमात आलेली खरीप पिके सुकू लागली आहेत. मका, सोयाबीन, उडीद, मुंग दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. तर कापूस, फुले पातेने बहरत आहेत. खरीप हंगामातील पिकांना ऐन फळधारणेच्या वेळी पावसाची नितांत गरज असताना पावसाने दडी मारली आहे.

तालुक्यातील १ लाख ६ हजार ८००९ हेक्टर क्षेत्रावरील पिके धोक्यात आली आहेत . उन्हाची तीव्रता वाढल्याने व अंतर्गत मशागतीने जमिनीतील ओल कमी झाल्याने, पिके माना टाकून करपू लागली आहेत. जूनपासून खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने तुरळक व हलक्या स्वरूपात हजेरी लावल्याने शेतकर्‍यांनी कापूस, तूर, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, उडीद, मका, मुंग आदी पिकांची पेरणी केली. परंतु पाऊस गायब झाल्याने सोयाबीन व इतर पिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी आंतरमशागत, खुरपणी, फवारणी यावर मोठा खर्च केला आहे. परिसरात दमदार पाऊस नसला, तरी हलक्या सरींमुळे पिकांची वाढ झाली. मात्र, आंतरमशागतीत जमिनीतील ओल उडून पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे.

तोंडचा घास जाणार

सध्या पिके जोमात आली असली, तरी उडिद , सोयाबीन ऐन फुलोऱ्यात असताना पावसाने दडी मारली आहे. परिणामी सोयाबीनची फूलगळ होत असून, पिके करपत आहे, तर पिकाची वाढ खुंटली आहे.

अजिंठा परिसरात यंदा सोयाबीचे क्षेत्र वाढले आहे. कापूस, मुंग, उडीद व सोयाबीन फुलात असताना पाऊस गायब झाला. याचा परिणाम उत्पन्नावर होणार आहे. बियाणे, खते, कीटकनाशक असा मोठा खर्च शेतकऱ्यांनी केला आहे. आता पिके अंतिम टप्प्यात असताना पाऊस नसल्याने हातातोंडाशी आलेला घास जातो की काय, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.

अजिंठा खरीप पेरणी महसूल मंडळ व गाव निहाय पेरणी अहवाल सन २० २३- २४ प्रमाणे यंदा
कापूस २८१६, तूर ८३, मका- २९ ५३, मुंग ८२, उडीद ६०, भुईमुंग ३३, ज्वारी ११, बाजरी ७, मिरची ६० ५, वांगी १५, टोमाटो -९, अद्रक ८६, पाल्या भाज्या २४, सोयाबीन ६२५, असे एकूण ७४ २७ हेक्टर लागवड केली आहे.

तो उगवणारा दिवस कोरडाच जाऊ लागल्याने तालुक्यातील शेतकरी हैराण झाला आहे. एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने वाऱ्याच्या झुळुकीवर डोलणारी पिके आता सुकू लागली आहेत. येत्या चार दिवसांत पाऊस न झाल्यास हलक्या जमिनीवरची पिके तर पार करपून जाण्याची शक्यता आहे. एक लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागली आहेत.

खरिप पिक निहाय पेरणी अहवाल सन २०२३ -२४

कापूस -१७९२१, ऊस -१८४, मका -३७३०२.५२, उडीद – ११४४५८ , ज्वारी १७९२१, बाजरी २०८५, तूर – १३६७, मूंग -१३२०, भुईमूग – ४८६७५, तीळ ११, मिरची ५४१५, सोयाबीन ८८२२६ ८, अद्रक २०५०, हळद ४८, वांगी २००, २४३, पालेभाज्या ८२४३५,

तालुक्यात १ लाख ६ हजार ८००९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पिके सुकू लागली आहेत. कापसाची वाढ खुंटली आहे. कृषी विभागातून मिळालेल्या माहितीनुसार साधार १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना पाऊस नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.

हेही वाचा 

Back to top button