छ. संभाजीनगर : नाथसागर धरणातून डाव्या कालव्याद्वारे आवर्तन सुरू | पुढारी

छ. संभाजीनगर : नाथसागर धरणातून डाव्या कालव्याद्वारे आवर्तन सुरू

पैठण, पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या खरीप हंगामासाठी पैठण येथील नाथसागर धरणातून डाव्या कालव्याद्वारे शेती सिंचनासाठी १०० क्युसेक पाणी आज (दि.१) रोजी दुपारी दोन वाजता सोडण्यात आले. पाऊस नसल्यामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणावर पाटबंधारे विभागाने दिलासा दिला आहे. सायंकाळी सोडण्यात आलेला विसर्ग टप्प्याटप्प्याने ४०० क्युसेक पर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली.

जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी पाणी वाटप समितीची बैठक घेऊन यंदाच्या खरीप हंगामासाठी नाथसागर धरणातून डाव्या कालव्यात शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आज धरण उपअभियंता विजय काकडे, कनिष्ठ अभियंता आप्पासाहेब तुजारे, कालवा निरीक्षक किसनराव जावळे यांनी प्रथम डाव्या कालव्यात १०० क्युसेक पाण्याचे आवर्तन सुरू करून कालवा मुखाशी स्थिर करण्यात आला. सायंकाळपर्यंत ४०० क्युसेक विसर्ग वाढविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

दरम्यान, नाथ सागर धरणाची पाणी पातळी सध्या १५०७.०२ फुट इतकी आहे. पाण्याची टक्केवारी ३३.७३ नोंद आहे. मागील आजच्या तारखेला २१४७.०५४ पाण्याची पातळी तर टक्केवारी ९८.९० होती. वरील धरणातून पाण्याची आवक बंद आहे.

हेही वाचा 

Back to top button