छ.संभाजीनगर: दीड महिन्यानंतर अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा प्रवाहित | पुढारी

छ.संभाजीनगर: दीड महिन्यानंतर अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा प्रवाहित

सागर भुजबळ

फर्दापूर, अजिंठा लेणी परिसरात शुक्रवारी (दि.८) संध्याकाळी पाचच्या सुमारास तासभर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अजिंठा लेणीतील सुप्रसिद्ध सप्तकुंड धबधबा कोसळू लागला आहे. मनमोहक धबधब्याने विशाल रुप धारण केल्याचे दिसून येऊ लागले आहे.

मागील तीन महिन्यात अजिंठा लेणी परिसरात एकही दमदार पाऊस झाला नाही. त्यातच अधूनमधून पडणाऱ्या रिमझिम पावसाने ही जवळपास एक ते दीड महिना दडी मारल्याने अजिंठा लेणीतील सुप्रसिद्ध सप्तकूंड धबधबा खंडित झाला होता. गुरुवारी पहाटेपासून या परिसरात पाऊस सुरु असल्याने हा धबधबा पून्हा प्रवाहीत झाला. तर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसानंतर अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा पुन्हा कोसळायला लागला आहे. शुक्रवारी रात्रभर अजिंठा लेणी परिसरात पावसाची संततधार सुरु होती.

हेही वाचा 

छत्रपती संभाजीनगर : पांढऱ्या वाघिणीने दिला दोन बछड्यांना जन्म

छत्रपती संभाजीनगर : मराठा क्रांती मोर्चाचा एल्गार, मुकुंदवाडीत सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

छत्रपती संभाजीनगर : प्लॉट मोजणीचा नकाश देण्यासाठी मागितली १.१० लाखांची लाच; दोन भूमापक गजाआड

Back to top button