Sambhajinagar News : बिडकीन येथील जेएसडब्ल्यू प्रकल्पाला सज्जन जिंदाल यांची भेट

व्यावसायिक बस- ट्रक निर्मितीचा घेतला आढावा, विभागांची पाहणी
Sambhajinagar News
Sambhajinagar News : बिडकीन येथील जेएसडब्ल्यू प्रकल्पाला सज्जन जिंदाल यांची भेटfile photo
Published on: 
Updated on: 

Sajjan Jindal visits JSW project in Bidkin

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बिडकीन येथील औद्योगिक वसाहतीमधील जेएसडब्ल्यू ग्रीनटेकच्या नव्या व्यावसायिक बस व ट्रक निर्मिती प्रकल्पाला जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी प्रकल्पातील उत्पादन विभागाची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला. या प्रकल्पातून उत्पादीत वाहनांचे लवकरच लाँचिंग केले जाणार आहे.

Sambhajinagar News
FDA action : साडेचार कोटी रुपयांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त

उद्योगनगरीतील या महत्वाकांक्षी प्रकल्पातील यंत्रसामग्री बसविण्याचे काम पूर्ण झाले असून, उत्पादनासाठी आवश्यक पायाभूत सुविधांवर जिंदाल यांनी समाधान व्यक्त केले. कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. पायाभूत सुविधा तयार असून, आता अपेक्षित उत्पादन उद्दिष्टे गाठण्यावर संपूर्ण टीमने लक्ष केंद्रित करावे, असे त्यांनी सांगितले.

या भेटीदरम्यान त्यांनी पेंट शॉपमधील कामकाजाचीही पाहणी केली. यामध्ये पीटी/सीईडी प्रक्रिया तसेच बसच्या रोबोटिक पेंटिंग प्रक्रियेचा समावेश होता. या प्रक्रियांतून प्रकल्पातील आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान आणि प्रगत उत्पादन क्षमतेचे दर्शन घडले. आधुनिक पायाभूत सुविधा, प्रगत तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळाच्या बळावर उत्पादनवाढ साध्य करण्यासाठी जेएसडब्ल्यू ग्रीनटेकची टीम सज्ज झाली आहे. आता निर्धारित उत्पादन क्षमता गाठण्याच्या दिशेने कंपनीची वाटचाल सुरू आहे.

Sambhajinagar News
Crime News : शतपावली करणाऱ्या विद्यार्थ्याला टोळक्याची मारहाण

प्रकल्प व्यवस्थापनाची प्रशंसा

जिंदाल यांनी जानेवारीपर्यंत बस आणि ट्रक या दोन्ही वाहनांचे उत्पादन प्रकल्पाच्या निर्धारित क्षमतेनुसार सुरू करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले आहे. प्रकल्पाच्या एकूण विकासाबद्दल तसेच संपूर्ण परिसरात राखण्यात आलेल्या स्वच्छता, सुव्यवस्था आणि कार्यक्षम व्यवस्थापनाच्या '5S' मानकांबद्दलही त्यांनी प्रशंसा केली.

दिवाळीनंतर वाहनांचे लाँचिंग

जेएसडब्ल्यू मोटर्सने बिडकीन येथील ६०० अधिक एकरच्या विस्तीर्ण प्लांटमध्ये वाहन उत्पादनाची तयारी पूर्ण केली आहे. बाजारपेठेत अधिकृत प्रवेश करण्यापूर्वी रस्ते आणि हवामानानुसार या आगामी वाहनांची सखोल चाचणी घेतली जात आहे. दिवाळीनंतर वाहनांचे लॉचिंग केले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news