Sambhajinagar News : मराठवाड्याच्या सिंचन अनुशेषासाठी हायकोर्टात जनहित याचिका

१६ वर्षांपासून सिंचन अनुशेष निधी बंद; मुख्य सचिवांसह प्रतिवादींना हायकोर्टाची नोटीस
Sambhajinagar News
Sambhajinagar News : मराठवाड्याच्या सिंचन अनुशेषासाठी हायकोर्टात जनहित याचिकाfile photo
Published on: 
Updated on: 

Public interest litigation in the High Court regarding irrigation backlog in Marathwada

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्याच्या सिंचनाबाबत भौतिक व आर्थिक अनुशेष शिल्लक असल्याने तज्ञ समिती नेमून नवीन अहवाल येईपर्यंत अंतरिम मदत म्हणून दरवर्षी सिंचन अनुशेष निधी देण्यात यावा, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेवरील सुनावणीत न्या. नितीन सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब शिंदे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांसह इतर प्रतिवादींना नोटीस बजावली आहे.

Sambhajinagar News
Paithan News : पैठण एमआयडीसीमधील कंपनीला राधिका मर्चेंट यांची भेट

मराठवाडा सिंचन अनुशेषाचा निधी मिळावा आणि समन्यायी विकासाबाबत 'नागपूर करार १९५३' ची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी जल अभ्यासक वाय. आर. जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये राज्याचे मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ प्रतिवादी आहेत.

समन्यायी विकासासाठी मराठवाडा व विदर्भातील लोकप्रतिनिधींच्या मागणीवरुन तत्कालीन शासनाने अहवाल देण्यासाठी प्रथमतः १९८३ मध्ये प्रो. वि. म. दांडेकर यांचे अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापन केली व १९९६ मध्ये राज्याच्या तीन प्रदेशाच्या वैधानिक विकास मंडाळाच्या अध्यक्षांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली निर्देशांक व अनुशेष समिती स्थापन करण्यात आलेली होती.

या समितींच्या शिफारशीनुसार सिंचनासाठी २००९ ते २०१० पर्यंत अनुशेष निधी नियमित देण्यात आला. नंतर मराठवाड्याचा सिंचन अनुशेष संपला असे शासनाने जाहीर केले व २०१०-२०११ पासून सिंचन अनुशेष निधी देणे बंद केले. पण, उपलब्ध अभिलेख्यावरुन सिंचन अनुशेष शिल्लक असल्याचे दिसते. मात्र विदर्भास २०१०-२०११ पासून अनुशेष निधी नियमितपणे देण्यात येत आहे. मराठवाड्यास अनुशेष निधी देणे बंद केल्यापासून जवळपास १६ वर्षांचा कालावधी लोटला आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्यावतीने करण्यात आला.

Sambhajinagar News
Drought News : दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एका महिन्याचे मानधन

मराठवाड्याच्या सिंचनाबाबत भौतिक व आर्थिक अनुशेष शिल्लक असल्याने 'तज्ञ समिती' नेमून नवीन अहवाल येईपर्यंत अंतरिम मदत म्हणून दरवर्षी सिंचन अनुशेष निधी देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत २४ सप्टेंबर रोजी सुनावणी होऊन खंडपीठाने प्रतिवादीस नोटीस काढण्याचे आदेश दिले. पुढील सुनावणी २२ ऑक्टोबर रोजी आहे. याचिकाकर्त्याच्या वतीने अॅड. राजेंद्र काळे व अॅड. विश्वेश्वर पठाडे काम पाहत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news