Paithan News : पैठण एमआयडीसीमधील कंपनीला राधिका मर्चेंट यांची भेट

राधिका मर्चेंट-अंबानी व त्यांचे वडील उद्योजक विरेन मर्चेंट हे ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय दौऱ्यावर पैठण एमआयडीसी येथे आले आहेत.
Paithan News
Paithan News : पैठण एमआयडीसीमधील कंपनीला राधिका मर्चेंट यांची भेटfile photo
Published on: 
Updated on: 

Radhika Merchant visits a company in Paithan MIDC

पैठण, पुढारी वृत्तसेवा: पैठण एमआयडीसी परिसरातील औषधी उत्पादन क्षेत्रातील इनकोर हेल्थकेअर कंपनीच्या संचालिका राधिका मर्चेंट-अंबानी व त्यांचे वडील उद्योजक विरेन मर्चेंट हे ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय दौऱ्यावर पैठण एमआयडीसी येथे आले आहेत. बुधवारी (दि.३०) त्यांचे हेलिकॉप्टरने संत एकनाथ सहकारी साखर कारखाना परिसरातील हेलिपॅडवर आगमन झाले. कडक सुरक्षा व्यवस्थेत खासगी वाहनांच्या ताफ्यासह त्यांनी पैठण एमआयडीसीतील इनकोर हेल्थकेअर कंपनीकडे प्रयाण केले.

Paithan News
Health Department Recruitment : गुणवत्ता यादीला बगल; ८४ कंत्राटी पदांची भरती

दौऱ्यादरम्यान राधिका मर्चेंट-अंबानी व विरेन मर्चेंट यांनी कंपनीच्या विविध विभागांना भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. औषधी उत्पादनाची गुणवत्ता, उत्पादन प्रक्रिया, कंपनीतील विविध यंत्रणा तसेच सुरू असलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.

कंपनीच्या आगामी प्रकल्पांची प्रगती, उत्पादन क्षमता, गुणवत्ता नियंत्रण आणि विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कंपनी परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती.

दरम्यान, मर्चेंट यांचे हेलिपॅडवर आगमन होताच त्यांना पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी कंपनीचे तज्ज्ञ व संबंधित अधिकारी त्यांच्यासोबत उपस्थित होते.

Paithan News
Drought News : दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एका महिन्याचे मानधन

मागील नऊ महिन्यांत तिसऱ्यांदा भेट

राधिका मर्चेंट-अंबानी व विरेन मर्चेंट यांची इनकोर हेल्थकेअर कंपनीला मागील नऊ महिन्यांतील ही तिसरी भेट आहे. यापूर्वी त्यांनी १ व २ डिसेंबर २०२५ रोजी कंपनीला भेट दिली होती. त्यानंतर २६ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांनी पुन्हा कंपनीला भेट देत कामकाजाची पाहणी केली होती. आता ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर असा त्यांचा दोन दिवसीय दौरा होत आहे.

logo
Pudhari News
pudhari.news