Vande Bharat : 'वंदे भारत'मधील जेवणाचा दर्जा निकृष्ट

३८० रुपये आकारून जळालेल्या पोळ्या आणि साधी भाजी; प्रवाशांमधून संताप
Vande Bharat : 'वंदे भारत'मधील जेवणाचा दर्जा निकृष्ट
Published on
Updated on

Poor quality of food on 'Vande Bharat'

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मुंबई-नांदेड वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या जे-वणात करपलेल्या पोळ्या आणि साधारण भाजी देण्यात येते. विशेष म्हणजे ग्रुपने तिकीट काढल्यास त्यातील एका प्रवाशांना जेवण घेण्याची मुभा नाही. प्रवाशांकडून जे-वणासाठी स्वतंत्र शुल्क आकारले जात असताना निकृष्ट दजीचे अन्न दिले जात असल्याने प्रवाशांत नाराजीचा सुर उमटला आहे.

Vande Bharat : 'वंदे भारत'मधील जेवणाचा दर्जा निकृष्ट
Pudhari Maha Icon 2026: मोटरसायकलीसाठी पेट्रोलची गरज नाही, इथेनॉलवर धावणार; गडकरींची घोषणा

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत एक-सप्रेसमध्ये प्रवाशांना जेवण हवे असल्यास त्याच्याकडून तिकीट काढतानाच ३८० रुपये आकारले जातात. दरम्यान, या बदल्यात जेवणाचा दर्जा मात्र निकृष्ट आहे. नुकतेच मुंबईहून नांदेडकडे जाणाऱ्या वंदे भारत एक-सप्रेसमध्ये जेवणात करपलेल्या पोळ्या आणि साधी भाजी आणि नॉनव्हेजसाठी एकच गिरेव्ही असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

प्रवाशांना दिलेल्या जेवणातील पोळ्या बरोबरच भाजी आणि इतर पदार्थींचाही दजी समाधानकारक नसल्याचे सांगण्यात आले. वंदे भारतसारख्या प्रीमियम रेल्वे सेवेमध्ये अशा प्रकारचे अन्न दिले जात असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

Vande Bharat : 'वंदे भारत'मधील जेवणाचा दर्जा निकृष्ट
Raigad Fort highway : किल्ले रायगड महामार्ग तर बनला; नेटकेपणा कधी येणार?

ग्रुपवर जेवणाची सक्ती ।

एकाच घरातील किंवा एखादा ग्रुप वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करत असेल, त्याला तिकीट काढताना एकालाच जेवणाची गरज असेल तर तसे मागवण्याचे ऑप्शन नाही. ग्रुपचे तिकीट असेल तर सर्वच प्रवाशांना जेवण मागवणे बंधनकारक आहे. या मनमानी कारभारामुळेही प्रवाशांत नाराजी पसरली आहे.

प्रवाशांकडून जेवणासाठी अतिरिक्त पैसे आकारूनही दर्जेदार सुविधा मिळत नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली. काही प्रवाशांनी सोशल मीडियावर छायाचित्रे शेअर करत रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. याची रेल्वे प्रशासन व संबंधित केटरिंग व्यवस्थापनाने गंभीर दखल घेऊन अन्नाच्या गुण-वत्तेची तपासणी करावी, तसेच दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news