AICTE Approval for Mechatronics Engineering - मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला एआयसीटीईची मान्यता

Mechatronics Engineering- मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला एआयसीटीईची मान्यता
Mechatronics Engineering
Mechatronics Engineering
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दीनदयाळ उपाध्याय कौशल्य केंद्रात बी.टेक मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी अभ्यासक्रम अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) मान्यता दिली आहे. सदर अभ्यासक्रमास यंदा २० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून तंत्रशिक्षण संचालक सीईटी सेलने मान्यता दिली आहे, अशी माहिती संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली.

विद्यापीठाच्या दीनदयाळ उपाध्याय कौशल्य केंद्रामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बी.टेक. (मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी) अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची घोषणा करण्यात आली आहे. या अभ्यास-क्रमाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण अभियांत्रिकी, परिषद तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालय यांची मान्यता प्राप्त झाली आहे.

Mechatronics Engineering
Brother Kills Sister’s Puppies |क्रुरतेचा कळस! मालमत्तेच्या वादातून सख्ख्या भावानेच बहिणीच्या दोन श्वान पिल्लांना केले ठार

या अभ्यासक्रमासाठी २० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता मंजूर करण्यात आली आहे. मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी हे यांत्रिक अभियांत्रिकी, ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्स, विद्युत प्रणाली, ऑटोमेशन, रोबोटिक्स, एम्बेडेड सिस्टिम्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि औद्योगिक नियंत्रण तंत्रज्ञान अशा विविध शाखांचा समन्वय साधणारे आंतरविद्याशाखीय क्षेत्र आहे. हा अभ्यासक्रम इंडस्ट्री, स्मार्ट मॅन्युफॅ-क्चरिंग, ऑटोमेशन आणि बुद्धिमान प्रणाली या उदयोन्मुख क्षेत्रांमधील रोजगार व करिअरच्या संधींसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे.

Mechatronics Engineering
Chhatrapati Sambhajingar | 'हेल्मेट सक्ती'चा बडगा; ४ तासांत ११३० दुचाकीस्वारांवर कारवाई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news