Manoj Jarange Patil: सरकारने काढला जीआर! मोडी-फारसी लिपी वाचकांसाठी घेतला मोठा निर्णय! जरांगे पाटलांचं नेमकं आवाहन काय?

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत मोडी आणि फारसी लिपीतील जुन्या नोंदी शोधण्यासाठी सरकारने विशेष अधिकार देण्याबाबत जीआर काढल्याची माहिती दिली.
Manoj Jarange Patil Modi and Persian script
Manoj Jarange Patil Modi and Persian script Pudhari
Published on
Updated on

Manoj Jarange Patil: मराठा समाजाच्या जुन्या नोंदी शोधण्यासाठी मोडी आणि फारसी लिपी वाचकांना विशेष अधिकार देण्यासंदर्भात राज्य सरकारने शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे. या निर्णयाची माहिती महाराष्ट्रातील बांधवांना देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.

जरांगे पाटील यांनी सांगितले की, राज्य सरकारच्या वतीने यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले असून, मोडी लिपी तसेच फारसी लिपीतील जुन्या नोंदी शोधण्यासाठी संबंधित अभ्यासक आणि वाचकांना विशेष अधिकार दिले जाणार आहेत. या माध्यमातून जुन्या दस्तऐवजांमध्ये असलेल्या नोंदी शोधण्याचे काम अधिक चांगल्या प्रकारे करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Manoj Jarange Patil Modi and Persian script
Gold Silver Price Today: खरेदीचा विचार करताय? सोनं 1.53 लाखांच्या वर, चांदीतही जोरदार वाढ; जाणून घ्या आजचे ताजे दर

राज्यातील मोडी लिपीचे अभ्यासक, मोडी लिपी वाचणारे जाणकार तसेच फारसी लिपीचे वाचक यांनी या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. समाजाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या जुन्या नोंदी शोधण्यासाठी सर्व बांधवांनी आपापल्या परीने योगदान द्यावे, असेही त्यांनी म्हटले.

यासाठी 23 सप्टेंबरपासून 27 सप्टेंबरपर्यंत छत्रपती संभाजीनगर येथे येऊन आपले नाव नोंदवावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. संबंधित अभ्यासक आणि वाचकांनी नाव नोंदवल्यानंतर सरकारकडून त्यांना नोंदी शोधण्याच्या कामासाठी विशेष अधिकार देण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.

Manoj Jarange Patil Modi and Persian script
Maharashtra UCC Panel: समान नागरी कायद्या समितीत मोठी खळबळ! न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण यांनी अचानक दिला राजीनामा, काय घडलं?

दरम्यान, सरकारने यासंदर्भातील जीआर जारी केल्याचे सांगत जरांगे पाटील यांनी मोडी आणि फारसी लिपीचा अभ्यास असलेल्या व्यक्तींनी पुढे येण्याचे आवाहन केले. जुन्या नोंदी शोधण्याच्या प्रक्रियेत अधिकाधिक लोकांनी सहभागी होऊन समाजाच्या हितासाठी योगदान द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news