Manoj Jarange | तीन महिन्यांत मागण्या पूर्ण करा; अन्यथा पाटोद्यापासून मुंबईपर्यंत आंदोलन : जरांगे

कुणबी प्रमाणपत्राची अनेक ठिकाणी प्रलंबित असलेली वैधता प्रमाणपत्रे जाणिवपूर्वक थांबवू नयेत, अशी मागणी जरांगे यांनी केली.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilpudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर सरकारने तीन महिन्यांत ठोस निर्णय घ्यावा. दिलेल्या मुदतीत मागण्या पूर्ण न झाल्यास पाटोद्यापासून पुन्हा आंदोलन सुरू करून ते मुंबईपर्यंत नेले जाईल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दिला.

शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान सोमवारी (दि.२८) सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जरांगे म्हणाले, आंदोलनादरम्यान बलिदान दिलेल्या कुटुंबांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. नियुक्त्यांमध्ये 'अनुकंपा' हा शब्द अडथळा ठरत असल्यास तो वगळून 'विशेष बाब' म्हणून नियुक्ती द्यावी. तसेच कुणबी प्रमाणपत्राची अनेक ठिकाणी प्रलंबित असलेली वैधता प्रमाणपत्रे जाणिवपूर्वक थांबवू नयेत, अशी मागणी त्यांनी केली. एसईबीसी आरक्षणासह अन्य प्रश्नांवर सरकारने दिलेला शब्द पाळावा, असेही ते म्हणाले.

Manoj Jarange Patil
Beed water protest : आष्टीतील जनतेचा जलआक्रोश मोर्चा

सरकारशी झालेल्या चर्चेत संबंधित आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे सांगण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. आंदोलन येवला, नाशिकमध्ये 'काड्या करणाऱ्यां'च्या जवळ आंदोलन होऊ शकते, असा इशाराही त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांना दिला. मुंबई मिशन ३.० अद्याप अपूर्ण आहे. तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुन्हा सुरू होईल. असेही ते म्हणाले.

....तर अंतरवाली सराटी आंदोलन करण्यास तयार

जरांगे म्हणाले, अंतरवाली सराटी गावाबाबत आपण कोणतीही टीका करणार नसल्याचे सांगत, या गावाने मराठा समाजासाठी संघर्ष केला असून समाजानेही गावासाठी लढा दिला आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने काही वक्तव्य केले तरी ते मनावर न घेता संयम ठेवावा, असे आवाहन त्यांनी समाजबांधवांना केले. आंदोलन अंतरवालीतच व्हावे, असे कोणाला वाटत असल्यास त्यांनी व्यासपीठ उभारावे. आपण तेथे आंदोलन करण्यास तयार असल्याचेही जरांगे म्हणाले.

Manoj Jarange Patil
Essar Group: ट्रम्पही झाले खूश! एस्सार ग्रुप अमेरिकेत उभारणार जगाला टक्कर देणारा स्टील प्लांट, किती कोटींची गुंतवणूक केली?

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर पुन्हा टीका

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, तीन वर्षे सलग शिंदे साहेब म्हणालो; मात्र आता तुमच्या लोकांनी चूक केली. आपले मत वाया गेल्याचे मराठा समाजाला कळत आहे. अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जात असा आरोप करत आता मागे सरकायचे नाही. आपले कुणीही नाही. त्यांची सत्ता आणि मालमत्ता वाचवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत, अशीही टीका त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news