Essar Group: ट्रम्पही झाले खूश! एस्सार ग्रुप अमेरिकेत उभारणार जगाला टक्कर देणारा स्टील प्लांट, किती कोटींची गुंतवणूक केली?

Essar Group to Invest $18 Billion in US Steel Plant: भारतीय एस्सार ग्रुप अमेरिकेत तब्बल १८ अब्ज डॉलरची गुंतवणूक करून आयोवा येथे मोठा स्टील प्लांट उभारणार आहे.
Essar Group Investment USA
Essar Group Investment USAPudhari
Published on: 
Updated on: 

Essar Group to Invest $18 Billion in US Steel Plant: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय उद्योगसमूह एस्सार ग्रुपच्या अमेरिकेतील मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली. एस्सार ग्रुपची अमेरिकेतील कंपनी मेसाबी मेटालिक्स (Mesabi Metallics) आयोवा राज्यात सुमारे १८ अब्ज डॉलर (सुमारे १.६ लाख कोटी रुपये) खर्च करून मोठा स्टील प्रकल्प उभारणार आहे.

व्हाइट हाऊसमध्ये एस्सार ग्रुपचे सहसंस्थापक रवी रुईया आणि मेसाबी मेटालिक्सचे (Mesabi Metallics) अध्यक्ष रेवंत रुईया यांच्या उपस्थितीत ट्रम्प यांनी ही घोषणा केली. हा प्रकल्प अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा स्टील प्लांट असेल, असा दावा ट्रम्प यांनी केला.

वर्षाला १ कोटी टन स्टीलचे उत्पादन

हा स्टील प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर दरवर्षी सुमारे १ कोटी टन स्टीलचे उत्पादन करण्याची क्षमता त्याची असेल. या प्रकल्पातून २०३० पासून उत्पादन सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

प्रकल्पाच्या उभारणीदरम्यान हजारो रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. प्रकल्प सुरू झाल्यानंतर स्टील उत्पादन आणि खाणकामाशी संबंधित सुमारे २ हजार कायमस्वरूपी नोकऱ्या उपलब्ध होतील.

मिनेसोटामधून आयर्न ओअर, आयोवामध्ये स्टील उत्पादन

या प्रकल्पाची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे स्टील उत्पादनासाठी लागणारे लोखंड अमेरिकेतीलच खाणीतून आणले जाणार आहे. मेसाबी मेटालिक्स मिनेसोटामधील Mesabi Iron Range भागात नवीन लोखंडाच्या खाणीचा विकास करत आहे.

या खाणीसाठी कंपनीने आतापर्यंत सुमारे २.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. ही खाण दरवर्षी सुमारे ७५ लाख टन लोखंडाचे उत्पादन करेल. या खाणीतून सुमारे ३५० रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

अशा प्रकारे मिनेसोटामधील खाणीतून लोखंड काढले जाईल आणि ते आयोवा येथील प्रकल्पात आणून स्टील तयार केले जाईल. म्हणजेच खाणीतून थेट स्टील कारखान्यापर्यंतची संपूर्ण उत्पादन साखळी अमेरिकेतच उभी केली जाणार आहे.

Essar Group Investment USA
Gold Price Prediction: सोन्याच्या दराबाबत मोठा अंदाज! २०२६ अखेरपर्यंत भाव कुठे पोहोचणार? २०२७ मध्येही तेजीची शक्यता, खरेदी करावं का?

रेवंत रुईया म्हणाले, 'ही माझ्यासाठी घरवापसी'

मेसाबी मेटालिक्सचे अध्यक्ष रेवंत रुईया यांनी सांगितले की, त्यांचा जन्म भारतात झाला असला तरी त्यांनी न्यूयॉर्क, बोस्टन आणि कॅलिफोर्नियामध्ये शिक्षण घेतले आहे. आपल्या आयुष्यातील जवळपास निम्मा काळ अमेरिकेत घालवल्याचे त्यांनी सांगितले.

अमेरिकेतील या मोठ्या गुंतवणुकीला त्यांनी 'घरवापसी' असे संबोधले. या प्रकल्पामुळे खाणीतून स्टील कारखान्यापर्यंतची उत्पादन व्यवस्था तयार होईल, असेही त्यांनी सांगितले.

Essar Group Investment USA
UPI MDR Charges: UPI वर चार्ज का? MDR मधून नेमकी कोणाची कमाई होणार? सुप्रीम कोर्टाचा सरकार आणि RBIला थेट सवाल

ट्रम्प यांनी स्टीलवरील शुल्काचा केला उल्लेख

डोनाल्ड ट्रम्प यांनी या गुंतवणुकीचा संबंध त्यांच्या सरकारच्या स्टीलवरील आयात शुल्काशी जोडला. अमेरिकेत उत्पादन उभारल्यास कंपन्यांना आयात शुल्क भरावे लागणार नाही, त्यामुळे त्या अमेरिकेतच गुंतवणूक करत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

ट्रम्प यांनी मिनेसोटातील खाण ही अमेरिकेत गेल्या ५० वर्षांहून अधिक काळातील पहिली नवीन आयर्न ओअर खाण असल्याचा दावा केला. या खाणीतील लोखंड उच्च दर्जाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

रेवंत रुईया यांनी हा प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असेल आणि आकार, गुणवत्ता तसेच उत्पादन खर्चाच्या बाबतीत जगातील इतर मोठ्या स्टील प्रकल्पांशी स्पर्धा करेल, असे सांगितले.

या प्रकल्पामुळे भारतीय उद्योगसमूहाची अमेरिकेतील मोठी गुंतवणूक वाढणार असून, अमेरिकेतील स्टील उत्पादनाला चालना देण्याचा प्रयत्न म्हणून या घोषणेकडे पाहिले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news