Induction stove price increase : ग्राहकांना इंडक्शन दरवाढीचे चटके

कंपन्या आणि व्यापाऱ्यांकडून शेगडीमागे ३०० ते ५०० रुपयांची वाढ
Induction stove price increase
ग्राहकांना इंडक्शन दरवाढीचे चटकेpudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : मध्यपूर्वेत पेटलेल्या युद्धामुळे गॅस टंचाई निर्माण झाली असून, घरगुती गॅससाठी एजन्सींवर रांगा लागल्या आहेत. तासनतास थांबूनही गॅस मिळत नसल्याने मेटाकुटीला आलेल्या ग्राहकांनी आता इलेक्ट्रिक शेगडीचा पर्याय निवडला आहे. अचानक इलेक्ट्रिक शेगडीची मागणी प्रचंड वाढल्याने कंपन्यांसह व्यापाऱ्यांनी शेगडीमागे ३०० ते ५०० रुपयांची दरवाढ करून ग्राहकांची लूट सुरू केली आहे.

इराण-इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यातच साठेबाजी रोखण्यासाठी कंपन्यांनी बुकिंगचे नियम बदलल्याने गॅस टंचाईचे चटके थेट स्वयंपाकघरापर्यंत पोहोचले आहेत. गॅस मिळत नसल्याने धास्तावलेले ग्राहक इलेक्ट्रिक शेगडी, इंडक्शन कुकटॉप आणि इन्फ्रारेड कुकरच्या खरेदीसाठी गर्दी करत आहेत. गेल्या चार दिवसांपासून इलेक्ट्रिक शेगडीची विक्री अनेक पटींनी वाढली आहे.

Induction stove price increase
Caterers switch to pellet stove : केटरर्सनी शोधला पॅलेट्स भट्टीचा पर्याय; तब्बल ५० भट्ट्यांचे बुकिंग

व्यापाऱ्यांकडे महिन्याला एक-दोन शेगड्यांची होणारी विक्री आता दररोज १५ ते २० शेगड्यांपर्यंत पोहोचली आहे. मागणी वाढल्याने आणि साठा (स्टॉक) संपत आल्याने लोकलपासून ब्रँडेड शेगडीपर्यंत सर्वच प्रकारांत ३०० ते ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आधी कंपन्यांकडून महिन्याभराच्या मुदतीवर शेगड्या मिळायच्या, आता रोख पैसे देऊनही प्रतीक्षा करावी लागत आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.

खिशाला बसणार भुर्दंड

बाजारात १६०० ते ४५०० रुपयांपर्यंत विविध कंपन्यांचे इंडक्शन उपलब्ध आहेत. हे इंडक्शन साधारणपणे २००० ते २२०० वॅट क्षमतेचे असतात. सध्या प्रत्येक इंडक्शनमागे ग्राहकांना ३०० ते ५०० रुपये अधिक मोजावे लागत आहेत. त्यातच विजेचा वाढीव खर्चही ग्राहकांच्या खिशाला मोठा भुर्दंड ठरणार आहे.

Induction stove price increase
Gas Supply : गॅसटंचाईमुळे संभाजीनगरात 45 कंपन्या बंद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news