Caterers switch to pellet stove : केटरर्सनी शोधला पॅलेट्स भट्टीचा पर्याय; तब्बल ५० भट्ट्यांचे बुकिंग

गॅस सिलिंडरच्या तुलनेत खर्च होणार निम्मा
Caterers switch to pellet stove
पॅलेट्स भट्टीवर प्रत्यक्ष खाद्यपदार्थ शिजवून आणि तळून पाहताना केटरिंग व्यावसायिक.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यावसायिक (कमर्शियल) गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे संकटात सापडलेल्या केटरिंग व्यावसायिकांनी यावर मपॅलेट्स भट्टीफचा प्रभावी पर्याय शोधला आहे. या भट्टीची कार्यक्षमता तपासून ५० भट्ट्यांचे बुकिंगही करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गॅस सिलिंडरच्या तुलनेत या भट्टीचा खर्च निम्मा असल्याने लग्नकार्यातील केटरिंगच्या खर्चात मोठी बचत होणार आहे.

व्यावसायिक गॅस टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष महेश लाहोटी यांच्या पुढाकाराने शुक्रवारी वाळूज येथील एका कंपनीत केटरर्ससाठी पॅलेट्स भट्टीचे विशेष प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी प्रत्यक्ष खाद्यपदार्थ शिजवून आणि तळून पाहण्यात आले. गॅसच्या तुलनेत ही भट्टी किती कार्यक्षम आणि किफायतशीर आहे, याचा अनुभव उपस्थित व्यावसायिकांनी घेतला.

Caterers switch to pellet stove
Gas Supply : गॅसटंचाईमुळे संभाजीनगरात 45 कंपन्या बंद

या प्रात्यक्षिकाला ४० हून अधिक केटरर्स उपस्थित होते. गॅस टंचाईच्या काळातही केटरिंग व्यावसायिकांना आपला व्यवसाय विनाअडथळा सुरू ठेवणे या पर्यायामुळे सोपे होणार असल्याचे केटरिंग असोसिएशनकडून नमूद करण्यात आले आहे.

पॅलेट्स भट्टीची वैशिष्ट्ये

  • कमी खर्च : गॅस सिलिंडरच्या तुलनेत इंधनाचा खर्च ५०% कमी.

  • इंधन : लाकडाच्या भुकटीपासून तयार केलेले पॅलेट्स इंधन म्हणून वापरले जातात.

  • कार्यक्षमता: मोठ्या प्रमाणावर अन्न शिजवण्यासाठी गॅसप्रमाणेच वेगवान आहे.

  • पर्याय : गॅस टंचाईच्या काळात केटरिंग व्यवसायाला आधार.

Caterers switch to pellet stove
Gas Cylinder Shortage: गॅसटंचाईमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये चुली पेटल्या; उद्योग, हॉटेल, मेस अडचणीत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news