Sambhajinagar Crime : जन्मदाताच झाला वैरी; पाच वर्षाच्या गतिमंद चिमुकल्याची हत्या

केंब्रीज चौक ते सावंगी बायपासजवळ शेतात आढळला मृतदेह; निर्दयी बाप आणि महिला फरार
Sambhajinagar Crime News
मृतदेह कापडात गुंडाळून शेतात टाकला. त्यावर मातीचे ढेकळं टाकण्यात आली होती. (दुसऱ्या छायाचित्रात) पोलिसांनी मृतदेहवरील कापड काढताच चिमुकल्याने हातात ज्यूसचा ग्लास तसाच घट्ट पकडलेला होता.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : एका पाच वर्षीय गतिमंद आणि दिव्यांग चिमुकल्याचे ओझे वाटू लागल्याने स्वतःच्या जन्मदात्या बापानेच एका महिलेच्या मदतीने त्याची निघृण हत्या केली. या निष्पाप बालकाचा मृतदेह मंगळवारी (दि. १९) सकाळी सावंगी बायपास परिसरातील एका शेतात आढळून आला.

याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात रात्री उशिरा निर्दयी बाप संतोष सोनाजी ढाळे (रा. मोप, ता. रिसोड, जि. वाशीम) आणि एका महिलेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

Sambhajinagar Crime News
Crime News : महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या त्या तरुणाचाच निघाला मृतदेह

मंगळवारी सकाळी केंब्रीज चौक ते हर्सल सावंगी बायपास रोडवरील एका शेतात नांगराच्या सरीत कपड्याने झाकलेला एका लहान मुलाचा मृतदेह नागरिकांना दिसला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक निरीक्षक कैलास लहाने, उपनिरीक्षक विष्णू मुंडे आणि हवालदार गणेश डोईफोडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह घाटी रुग्णालयात पाठवला.

गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनीही पथकासह धाव घेत आर-ोपींचा शोध सुरू केला. दुपारपर्यंत या अज्ञात बालकाच्या खुनाचे गूढ पोलिसांसमोर होते. मृतदेहाचे वर्णन आणि फोटोच्या आधारे पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम राबवली.

तेव्हा, हा मुलगा चिकलठाणा परिसरातील सावित्रीनगर भागात राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी थेट घरमालक गाठून चौकशी केली असता मुलाच्या वडिलांचे नाव संतोष ढाळे असल्याचे निष्पन्न झाले. संतोषचे दोन विवाह झाले असून तो पहिल्या पत्नीपासून दोन वर्षांपासून वेगळा राहत होता. हलाखीच्या परिस्थितीमुळे उदरनिर्वाहासाठी ते कुटुंब अवघ्या आठ दिवसांपूर्वीच शहरात आले होते. संतोष पाण्याच्या जारच्या गाडीवर काम करत होता.

अमानुषतेचा कळसः श्वास कोंडला, डोक्यावर वार मृत ५ वर्षीय चिमुकला गतिमंद होता, तसेच त्याला चालताही येत नव्हते. त्याचे सततचे आजारपण आणि देखभाल यामुळे पालकांना तो ओझे वाटू लागला आणि त्यातूनच त्यांनी त्याला संपविले. घाटी रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालातून हत्येची क्रूरता समोर आली आहे. बालकाचे नाक-तोंड दाबून श्वास कोंडण्यात आला तसेच डोक्यावर आणि पोटावर बोथट वस्तूने जबर मारहाण करून त्याला मारण्यात आले.

शोधासाठी पथके रवाना

मुलाची ओळख पटताच पोलिसांनी तातडीने वाशिमच्या रिसोड पोलिसांशी संपर्क साधून एक पथक संतोषच्या मूळ गावी पाठवले. मात्र तो तिथे मिळून आला नाही. आरोपी संतोष ढाळे हा मोबाईल फोन वापरत नसल्याने त्याचे लोकेशन शोधण्यात पोलिसांना अडचण येत आहे. या फरार आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेसह पोलिसांची दोन विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

Sambhajinagar Crime News
Kalyan News | कल्याण-डोंबिवलीत विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

हातात ज्यूसचा ग्लास तसाच घट्ट

या घटनेतील सर्वात हृदय पिळवटून टाकणारी बाब म्हणजे, निर्दयी पालकांनी हत्या करण्यापूर्वी या चिमुकल्याला तो रडू नये म्हणून हातात ज्यूसचा ग्लास दिला होता. पोलिसांनी जेव्हा शेतातील खड्यातून माती आणि कपड्याने झाकलेला मृतदेह बाहेर काढला, तेव्हा त्या निष्पाप बालकाच्या चिमुकल्या हातात तो ग्लास तसाच घट्ट पकडलेला होता. हे दृश्य पाहून घटनास्थळावरील उपस्थितांचेही डोळे पाणावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news