Sanjay Shirsat : मराठवाड्यात दुष्काळ; मुख्यमंत्र्यांकडे मंत्रिमंडळ बैठकीचा आग्रह करणार

मंत्री संजय शिरसाट यांचे प्रतिपादन; मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा घेतला आढावा
Sanjay Shirsat
Sanjay Shirsat : मराठवाड्यात दुष्काळ; मुख्यमंत्र्यांकडे मंत्रिमंडळ बैठकीचा आग्रह करणार file photo
Published on
Updated on

Drought in Marathwada; will urge the Chief Minister to hold a cabinet meeting

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांसमोरील संकटामुळे विभागासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भरीव तरतूद करतील. परंतु, या परिस्थितीवर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक व्हावी, अशी अपेक्षा आहे, त्यासाठी येत्या कॅबिनेट बैठकीत आग्रह करणार असल्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी गुरुवारी (दि. १०) विभागीय आयुक्तालयात पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

Sanjay Shirsat
Sambhajinagar News : दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना अनुदान द्या

यावेळी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी, महापालिका आयुक्त अमोल येडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. भगत यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री शिरसाट यांनी अधिकाऱ्यांकडून मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला.

त्यासोबतच बैठकीत मराठवाड्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांसमोरील संकट यावरही चर्चा झाली. पावसाचा मोठा खंड वाढल्याने आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी शेतकरी सोयाबीनचे पीक काढून फेकत आहेत.

मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री संभाजीनगरमध्ये येत आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यासाठी मंत्रिमंडळ बैठक होते. परंतु, तीन वर्षांपासून ही बैठक झालेली नाही. त्यात आता दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आहे. यंदा बैठक घ्यावी, अशी मागणी यापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे सांगत पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, सध्याची परिस्थिती, मुख्यमंत्र्यांचे दौरे आणि प्रशासकीय धावपळीमुळे मंत्रिमंडळाची बैठक होणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

परंतु, यंदा मराठवाड्याला भरीव आर्थिक तरतूदीची आवश्यक आहे. त्यामुळे मुंबईतील येत्या कॅबिनेट बैठकीत मराठवाड्याची दुष्काळी स्थिती मांडून मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेण्याचा आग्रह आपण पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे शिरसाट यांनी सांगितले.

Sanjay Shirsat
Paithan News : मंत्री अतुल सावे यांच्या कुटूंबातील सदस्यांना मारहाण : पोळ्याच्या दिवशी नायगाव - खंडेवाडीला छावणीचे स्वरूप!

विविध कामांचे लोकार्पण, उद्घाटन

१७ सप्टेंबरच्या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात येणार आहे. महापालिका हद्दीतील विकासकामांसह केंब्रिज शाळा चौकातील राजमाता जिजाऊ चौकाचे लोकार्पण, विभागीय क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅक यासह विविध कामांचा यात समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news