Extortion case : शेंद्रातील भूखंडासाठी डॉक्टरकडे ९ लाखांच्या खंडणीची मागणी

आरोपीच्या त्रासामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याचाही आरोप; शहागंजच्या गावगुंडांवर चिकलठाणा पोलिसांत गुन्हा दाखल
Demand for ransom of Rs 9 lakh from doctor
Extortion case : शेंद्रातील भूखंडासाठी डॉक्टरकडे ९ लाखांच्या खंडणीची मागणीFile Photo
Published on
Updated on

Demand for ransom of Rs 9 lakh from doctor for plot in Shendra

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शेंद्रा एमआयडीसीतील औद्योगिक सहकारी संस्थेच्या जागेसाठी खोटे दावे आणि बदनामीची भीती दाखवून एका डॉक्टरकडे तब्बल ९ लाख रुपये आणि ४ औद्योगिक गाळ्यांची खंडणी मागणाऱ्या शहागंज येथील एका गावगुंडाविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीर अहतेशाम अली मीर जफर अली (रा. मनसबदार ट्रेडर्ससमोर, निजामुद्दीन रोड, शहागंज) असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीने दिलेल्या सततच्या मानसिक त्रासामुळे आणि दडपणामुळे फिर्यादीच्या आजारी वडिलांचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतरही आरोपीने फिर्यादी डॉक्टरचा छळ सुरूच ठेवला.

Demand for ransom of Rs 9 lakh from doctor
Ashadhi Ekadashi Train : आषाढी एकादशीनिमित्त नांदेड-पंढरपूर विशेष रेल्वेच्या दोन फेऱ्या

फिर्यादी डॉ. अक्षय अशोकराव बाभळगावकर (३५, रा. एन-३, सिडको) यांच्या तक्रारीनुसार, ते वैद्यकीय व्यावसायिक असून, ते 'बाभळगावकर औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित'चे अध्यक्ष आहेत. डॉ. अक्षय यांचे वडील कै. अशोकराव बाभळगावकर हे शेंद्रा एमआयडीसी येथील या संस्थेचे मुख्य प्रवर्तक होते. सन २००९ मध्ये एमआयडीसीने त्यांना २८ हजार स्क्वेअर मीटर जागा दिली होती, ज्यावर १५० औद्योगिक गाळे बांधण्याची परवानगी होती.

आरोपी अहतेशाम अली याचा या संस्थेशी कोणताही संबंध किंवा आर्थिक व्यवहार नसताना त्याने ११ नोव्हेंबर २०२४ रोजी वकिलामार्फत खोटी नोटीस पाठवून वडिलांना चौकशीत अडकवण्याची व बदनामीची भीती दाखवली आणि ४ लाख रुपयांची मागणी केली. डिसेंबर २०२४ मध्ये त्याने जागेचे व्हिडिओ शूटिंग करून डॉ. अक्षय यांच्या आजारी वडिलांना फोनवरून तुमची बदनामी करायची नसेल तर मला पैसे द्या, अशी धमकी दिली. या मानसिक त्रासामुळे व दडपणामुळे त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला आणि काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.

Demand for ransom of Rs 9 lakh from doctor
Garbage Collection Company : अवघ्या तीन महिन्यांतच कचरा संकलन कंपनीचे काम थांबण्याचे संकेत

पोलिस, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट कुणालाच घाबरत नाही

दीड महिन्यापूर्वी हा आरोपी शेंद्रा एमआयडीसीत प्लॉटवर आला आणि त्याने डॉ. अक्षय यांना तू पैसे दे, नाही तर मला प्लॉट दे, अशी दमदाटी केली. अक्षय यांच्या वडिलांचे मित्र संजय वाणी यांच्या माध्यमातून संपर्क साधला असता, २६ जून २०२६ रोजी आरोपीने संस्थेसंदर्भात अर्ज-फाटे न करण्यासाठी चक्क ४ गाळ्यांची मालमत्ता देण्याची मागणी केली. "मी काय कोणाला घाबरत नाही, पोलिस स्टेशन, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट माझे रोजचेच काम आहे, अशी दमदाटी केली. अखेर त्रासाला कंटाळून डॉ. अक्षय यांनी चिकलठाणा पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र बनसोड यांच्या मार्गदर्शनात एपीआय रामचंद्र पवार करत आहेत.

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीच्या नावाने धमकी

वडिलांच्या निधनानंतरही आरोपीने डॉ. अक्षय यांचा छळ सुरूच ठेवला. त्याने पैशाची मागणी वाढवत सुरुवातीला २ लाख, नंतर ४ लाख आणि शेवटी ९ लाखांपर्यंत मजल मारली. डॉ. अक्षय यांनी यासंदर्भात पुरावे मागितले असता, आरोपीने हर्मूल कारागृहातील एका खुनाच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांची पार्श्वभूमी सांगून त्यांना अप्रत्यक्षपणे जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच २८ जानेवारी २०२६ पासून खोटे व दिशाभूल करणारे पत्र पाठवून आणि सोशल मीडियावर संस्थेच्या जागेचा व्हिडिओ व बदनामीकारक गाणे लावून पैशासाठी बदनामी करण्यास सुरुवात केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news