

Two trips of the Nanded-Pandharpur special train for Ashadhi Ekadashi
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे होणारी अतिरिक्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड-पंढरपूर आणि नगरसूल-पंढरपूरदरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांचा लाभघेण्याचे आवाहन नांदेड विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
नांदेड-पंढरपूर विशेष रेल्वे २६ जुलै आणि २ ऑगस्ट रोजी नांदेड येथून रात्री ८ वाजता सुटून पूर्णा, परभणी, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी टाऊन, कुर्दुवाडी आणि मोडनिबमार्गे दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. पंढरपूर-नांदेड विशेष गाडी २७ जुलै आणि ३ ऑगस्ट रोजी पंढरपूर येथून सकाळी ८ वाजता सुटून मोडनिंब, कुर्दुवाडी, बार्शी टाऊन, धाराशिव, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी आणि पूर्णा मार्गे त्याच दिवशी रात्री ८.३० वाजता नांदेड येथे पोहोचेल.
तसेच नगरसूल-पंढरपूर विशेष गाडी २३ जुलै रोजी नगरसूल येथून रात्री ११ वाजता सुटून रोटेगाव, लासूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी टाऊन आणि कुर्डवाडीमार्गे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७ वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. या विशेष गाडीत २४ डबे असतील.
नगरसूल-पंढरपूर विशेष रेल्वे रद्द
आषाढी एकादशी यात्रेनिमित्त २४ जुलै चालविण्यात येणारी नगरसूल-पंढरपूर तसेच पंढरपूर-नगरसूल २५ जुलै सोडण्यात येणारी गाडी रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन केले आहे.