Crime News : महिलेच्या खुनानंतर तिच्या १४ महिन्यांच्या बाळालाही पाण्यात फेकून संपविले

५ लाखांच्या उधारीतून अपहरण करून माय-लेकरांची निघृण हत्या
Crime News : महिलेच्या खुनानंतर तिच्या १४ महिन्यांच्या बाळालाही पाण्यात फेकून संपविले
Published on
Updated on

Crime News: After murdering a woman, her 14-month-old baby was also thrown into the water and killed

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : उसने घेतलेले पैसे परत करण्याच्या बहाण्याने एका २६ वर्षीय महिलेचे आणि तिच्या १४ महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण करून त्यांचा अत्यंत निघृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नराधमांनी चालत्या कारमध्ये महिलेचा गळा आवळून खून केला, तर तिच्या १४ महिन्यांच्या निष्पाप बाळाला जिवंतपणीच वाहत्या पाण्यात फेकून त्याचा जीव घेतला. या हादरवून सोडणाऱ्या घटनेप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Crime News : महिलेच्या खुनानंतर तिच्या १४ महिन्यांच्या बाळालाही पाण्यात फेकून संपविले
Chhatrapati Sambhajinagar Crime : शहरात बाबा फर्जन नावाची होती दहशत

सायमा सलमान चौधरी (२६, रा. साजापूर) आणि तिचा १४ महिन्यांचा मुलगा साजिम ऊर्फ बाबू अशी या खून झालेल्या मायलेकांची नावे आहेत. तर, नुरजमा अहेमद चौधरी (२६, मूळ रा. उत्तर प्रदेश, ह.मु. पुणे) आणि सद्दाम ऊर्फ आमीर अहमद चौधरी (रा. साजापूर) अशी या नराधम आरोपींची नावे आहेत.

सायमा आणि तिचा मुलगा साजिम हे १ एप्रिलपासून साजापूर नापूर येथून बेपत्ता झाले होते. याप्रकरणी सायमाचे वडील अब्दुल लतीफ चौधरी यांनी एमआयडीसी वाळूज ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान, ६ एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात असलेल्या वावी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कणकोरी शिवारात एका विहिरीत महिलेचा मृतदेह आढळला. तपासाअंती तो मृतदेह सायमाचाच असल्याचे निष्पन्न झाले. खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान सायमाच्या बँक खात्यावरून नुरजमा सोबत ५० हजारांचा व्यवहार झाल्याचे, तसेच तिने सद्दामला ५ लाख रुपये दिल्याची माहिती मिळाली. याच उधारीच्या पैशांवरून पोलिसांचा संशय बळावला आणि गुन्ह्याचा उलगडा झाला.

Crime News : महिलेच्या खुनानंतर तिच्या १४ महिन्यांच्या बाळालाही पाण्यात फेकून संपविले
Partur Crime| परतूर हादरले; नवजात अर्भक प्रकरणात धक्कादायक खुलासा

...अन् पोलिसांच्याही अंगावर काटा आला

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची भयंकर कबुली दिली. सायमाला तिचे पैसे परत देण्याच्या बहाण्याने त्यांनी पंढरपूर (वाळूज परिसर) येथे बोलावून घेतले. तिथून सायमा आणि चिमुकल्या साजिमचे कारमधून (एमएच-१४-केडब्ल्यू-२२९०) अपहरण केले. प्रवासादरम्यान या दोघांनी ओढणीने सायमाचा गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह सिन्नर भागातील वावी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कणकोरी शिवारात एका विहिरीत फेकून दिला.

तिथून ते पुण्याकडे निघाले आणि वाटेत नदीच्या वाहत्या पाण्यात १४ महिन्यांच्या साजिमला त्यांनी जिवंतपणीच फेकून दिले. या भयंकर गुन्ह्याप्रकरणी मयत सायमाचे वडील अब्दुल लतीफ चौधरी यांच्या तक्रारीवरून सुरुवातीला वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता तो गुन्हा एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम पोलिस निरीक्षक संदीप राजपूत करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news