Chhatrapati Sambhajinagar Crime : शहरात बाबा फर्जन नावाची होती दहशत

बर्फ विक्रेत्याचा मुलगा बनला शहराचा डॉन; मृत्यूनंतरच्या कारवाईने ९० च्या दशकातील दहशतीच्या आठवणी ताज्या
Chhatrapati Sambhajinagar Crime
जप्त केलेली रोकड मोजताना पोलिस आणि बाबा फर्जनच्या घरात सापडलेला शस्त्रसाठा.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : एका पारसी कुटुंबातील बर्फाच्या व्यवसायिकाचा मुलगा ते कामगार नेता... आपल्या युनियनच्या माध्यमांतून कामगारांचे प्रश्न सोडवता सोडवता गुन्हेगारी जगताकडे वळालेले पाऊल, त्यातून निर्माण केलेला दबदबा आणि तेथून राजकारणांत प्रवेशाच्या अयशस्वी प्रयत्न, असा कुख्यात बाबा फर्जन याचा संभाजीनगरातील प्रवास.... गेल्या २० वर्षापासून बाबा फर्जन सार्वजनिक जिवनांपासून दूर असला तरी १९८० ते १९९० या दशकातील त्याच्या प्रवासांतून निर्माण झालेली तत्कालीन औरंगबादचा डॉन अशी ओळख आणि दहशत आज तागायत कायम होती. त्याच्या या प्रवासाला शुक्रवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईन पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.

शहरात काही मोजकेच व्यवसायिक पारसी कुटुंब होते. बाबा फर्जनच्या वडिलांचा शहरातील पहिला बर्फाचा कारखाना रोहिला गल्लीत होता. या व्यवसायात बाबा फर्जनही हातभार लावत होता. कामगार युनियन बरोबरच गुन्हेगारी जगताकडे वळलेल्या बाबाने दोन्ही क्षेत्रात दहशत पसरवली होती. त्याच्या दहशतीमुळे कंपन्यांत कोणतीह संघटना आपली युनियन लावण्यस धजावत नव्हती. वाढत्या दबदब्यानंतर अनेक राजकीय नेतेही बाबा फर्जनची मदत घेण्यासाठी त्याच्या घरी येत होते. अनेकदा गुन्हेगार, राजकीय नेते यांच्या बैठका बाबा फर्जन सोबत पार पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Baba Farjan House Raid | अबब! ५ कोटींची रोकड, ८ बंदुका अन्‌ ६,३५० जिवंत काडतुसे!!

एटीएससह मिलिट्रीचे पथक तपासासाठी दाखल

बाबा फर्जनच्या बंगल्यावर शुक्रवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे २० च्या दशकात दहशत निर्माण केलेल्या बाबा फर्जनच्या विविध कारणाम्यांनी आठवण ताजी झाली. त्याच्या मृत्यूनंतर ही कारवाई झाल्याने अनेकांना त्यांच्या मागील जिवनाचा इतिहास जाणून घेण्याची उत्सुकता शहरात दिसून आली. शहरातील एका घरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि जिवंत काडतुसे आढळून आल्याने दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) आणि मिल्ट्रीच्या पथकानेही या बंगल्याला भेट देऊन अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

अनेक दिवसांपासून होती पोलिसांची पाळत

बाबा फर्जन याच्या घरात मोठा शस्त्रसाठा तसेच पैशांचा खजिना असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी अनेक दिवसांपासून त्याच्या घरावर पाळत ठेवली. या बंगल्याच्या परिसरात तब्बल ५६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. परिसरात कोणा कोणाचा वावर आहे याची पूर्ण हालचाल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी संबंधित सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डीव्हीआर ताब्यात घेतले असून, त्यातील फुटेजची बारकाईने तपासणी सुरू केली आहे.

बंगल्यात कुत्र्यांची फौज

बाबा फर्जन विजनवासात असला तरी त्याच्या नावा प्रमाणेच त्याच्या बंगल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दहशत होती. बंगल्याच्या राखणदारीसाठी सात ते आठ कुत्र्यांची फौज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या कुत्र्यांमुळे त्या बंगल्याकडे कोणाची वाकडी नजर करण्याचीही हिम्मत होत नव्हती अशीही माहिती समोर आली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Crime News : निलंबित पोलिसाची पुन्हा गुंडगिरी ! भररस्त्यात कुटुंबाला अडवून मारहाण

बाबाच्या दहशतीपुढे अनेकांनी टेकले हात

बाबा फर्जनच्या दहशतीपुढे अनेकांनी हात टेकले होते. किरकोळ कारणांवरही तो पिस्तूल कनपटीस लावणे किंवा बंदुकीची दहशत दाखवणे असे प्रकार करत होता. अशाच काही प्रकरणांत त्याच्यावर चार गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात १९८३ मध्ये -हत्येचा प्रयत्न, १९८४ मध्ये-मारहाण, तर २०१६ मध्ये अपहरण करणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिस उपायुक्त शशिकांत सातव यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news