Partur Crime| परतूर हादरले; नवजात अर्भक प्रकरणात धक्कादायक खुलासा

मुख्य आरोपी गजाआड; गर्भपाताच्या गोळ्या पुरविणाऱ्या लॅब असिस्टंटसह चौघांवर गुन्हा
Jalna illegal abortion case
परतूर ः तालुक्यातील वाटूर येथे अर्भक फेकून देणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी छडा लावून आरोपीस अटक केली. (छाया ः भारत सवने )
Published on
Updated on

भारत सवने

परतूर ः परतूर पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या वाटूर परिसरात एका नवजात स्त्री जातीच्या अर्भकाचा मृतदेह फेकून दिल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी अत्यंत कौशल्याने छडा लावला. या प्रकरणी जालना येथील एका महिलेसह मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून, तपासादरम्यान आरोपीने जालना शहरातील अशाच एका जुन्या गुन्ह्याची कबुली दिल्याने खळबळ उडाली आहे. बेकायदेशीर गर्भपाताच्या गोळ्या पुरविणाऱ्या लॅब असिस्टंटसह अन्य एका महिलेचा पोलिस शोध घेत आहेत.

वाटूर येथे 6 फेब्रुवारी रोजी एका कागदात गुंडाळलेले 5 ते 6 महिन्यांचे मृत स्त्री जातीचे अर्भक आढळून आले होते. याप्रकरणी वाटूर चौकीचे पोलिस उपनिरीक्षक नंदू खंदारे यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर रेंगे आणि पोलिस निरीक्षक सुदाम भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस उपनिरीक्षक नंदू खंदारे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली.

Jalna illegal abortion case
Jalna News : जबरी चोरीतील अट्टल आरोपी जेरबंद

तपास पथकाने परतूर ते जालना मार्गावरील विविध सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यावेळी 6 फेब्रुवारीच्या पहाटे 2:24 ते 2:29 च्या सुमारास एका दुचाकीवरून एक पुरुष आणि दोन महिला (तोंड बांधलेल्या अवस्थेत) संशयास्पद रितीने वाटूर फाट्यावर थांबल्याचे सीसीटीव्हीत निदर्शनास आले. त्यातील एका महिलेने तेथे काहीतरी ठेवल्याचे दिसून आले. ही दुचाकी जालना शहरातील लालबाग परिसरात गेल्याचे तांत्रिक तपासात निष्पन्न झाले.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पोलिसांनी जालना येथील राजीव गांधी नगर भागात सापळा रचून शिवानी कैलास निकाळजे (वय 23) या महिलेला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच तिने आपला होणारा पती गणेश बबन कांबळे, सासू दुर्गाबाई कांबळे आणि एका नातेवाईकाच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

Jalna illegal abortion case
Sambhajinagar Chain snatching case : मंगळसूत्र चोरट्याकडून ९ लाखांचे दागिने हस्तगत

या प्रकरणात मुख्य आरोपी गणेश कांबळे हा फरार होता. त्याला 31 मार्च रोजी वाल्मिक नगर (जालना) येथून अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने धक्कादायक खुलासा केला. मार्च 2025 मध्ये त्याने जालना येथीलच भीमनगरमधील एका अन्य महिलेसोबत शरीरसंबंधातून राहिलेला गर्भ बेकायदेशीर गोळ्या देऊन पाडला होता. अर्भक कचराकुंडीत फेकून दिले होते. याप्रकरणी जालना येथील सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तो गुन्हा देखील आपणच केल्याचे आरोपीने कबूल केले आहे.

लॅब असिस्टंटचा सहभाग

या संपूर्ण प्रकरणात स्वामी विवेकानंद हॉस्पिटलमध्ये लॅब असिस्टंट म्हणून काम करणारा प्रकाश कसबे (रा. संजय नगर, जालना) हा बेकायदेशीरपणे गर्भपाताच्या गोळ्या पुरवत असल्याचे समोर आले आहे. सध्या प्रकाश कसबे आणि आरोपीची आई दुर्गाबाई कांबळे हे दोघे फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

तपास पथकाची कामगिरी

जालना पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर रेंगे, पोलिस निरीक्षक सुदाम भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी नंदू खंदारे, अंमलदार देवीदास जाधव, राम पारवे, अमोल तिबुले, प्रशांत काळे, सुनील इलग, महेश कोरडे आणि महिला पोलिस अंमलदार सपना वाघ यांनी ही यशस्वी कामगिरी केली. या कारवाईमुळे अवैध गर्भपात करणाऱ्या रॅकेटचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news