Sillod Crime News : वर्गमैत्रीणच उठली मैत्रिणीच्या जीवावर

सिल्लोड तालुक्यातील घटना, पाण्याच्या बाटलीत टाकले विष
Sillod Crime News
Sillod Crime News : वर्गमैत्रीणच उठली मैत्रिणीच्या जीवावर file photo
Published on
Updated on

Classmate puts poison in her friend's water bottle

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : क्षुल्लक कारणावरील भांडणातून मैत्रीणच मैत्रिणीच्या जीवावर उठल्याचा प्रकार सोमवारी (दि.१०) तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ असलेल्या गावातील हायस्कूलमध्ये समोर आला आहे. वर्गमैत्रिणीने मैत्रिणीच्या पिण्याचे पाणी असलेल्या बाटलीत विषारी औषध टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या घटनेने हायस्कूलमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Sillod Crime News
Sambhajinagar News : शहरातील रस्ते खोदणाऱ्या ठेकेदारांना दुरुस्तीची सक्ती

रिया व दिया (नाव बदलेले आहे) या दोघी वर्गमैत्रिणींमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. वादामुळे दोघी मैत्रिणींमध्ये अबोला निर्माण झाला. तर यातून रियाने दियाच्या पिण्याच्या पाणी असलेल्या बाटलीत विषारी औषध टाकले. मात्र पाणी पिण्यासाठी बाटली उघडली असता दियाला वेगळाच वास आला. शिवाय पाण्याचा रंगही वेगळाच दिसला. यामुळे तिला शंका आली व सदर प्रकार समोर आला.

विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही मैत्रिणी एकाच गावातील असल्याने शिक्षकांनी ही बाब ग्रामस्थांना सांगितली. ग्रामस्थ व हायस्कूलमधील शिक्षकांनी हे प्रकरण सामंजस्याने मिटवले. तर या प्रकरणी पाण्यात विषारी औषध टाकणारी मैत्रीण रियाला समज देण्यात आली.

Sillod Crime News
Maratha Reservation : शाश्वत आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही : दाते पाटील

त्या विद्यार्थिनीच्या पुढच्या शिक्षणाचे भवितव्य लक्षात घेत कुठलीही कार्यवाही न करता हायस्कूलमधून केवळ नाव कमी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे सदर विद्यार्थिनीला पुढील शिक्षण घेण्यात कुठलाही खोडा निर्माण होणार नसल्याचे हायस्कूल प्रशासनाने स्पष्ट केले. ग्रामस्थांनी हे प्रकरण सामंजस्याने मिटवत वादावर पडदा टाकला.

पालकांनी पाल्यांकडे लक्ष देण्याची गरज

सध्या तरुणाई, अल्पवयीन मुले सोशल मीडियावर रील व इतर व्हिडिओ पाहून त्याची प्रत्यक्ष जीवनात तसाच करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे अनेक प्रकार समोर आलेले आहेत. पालकांनी पाल्यांकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे बनल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news