Crime News: प्रेमप्रकरण की घातपात? २० वर्षीय लेकीचा मृतदेह गादीत गुंडाळला; गुपचूप अंत्यसंस्कारासाठी नेताना पोलिसांनी पकडलं

Chhatrapati Sambhajinagar news: छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरात आज एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Crime News
Crime Newsfile photo
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar news

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरात आज एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिसगाव चौफुली येथे गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घरातील सामानासोबत एका रिक्षातून हा मृतदेह संशयास्पदरीत्या नेला जात असताना पोलिसांनी तो पकडला.

Crime News
Crime News: दोन पत्नी असताना तिसरीशी सूत जुळलं, मग पैशांच्या वादातून प्रेयसीला मारलं; निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचं भयंकर कृत्य

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, एका रिक्षातून काही लोक घरातील साहित्यासह गावाकडे जात होते. मात्र, तिसगाव चौफुली परिसरात पोलिसांना या रिक्षातील हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी रिक्षा थांबवून तपासणी केली असता, गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह पाहून पोलीसही चक्रावून गेले.

आई-वडिलांचा अजब दावा

पोलिसांनी तातडीने चौकशी केली असता, मुलीच्या सावत्र आईने धक्कादायक माहिती दिली. "मुलीचे प्रेमसंबंध होते, त्यातून तिने गळफास घेऊन जीवन संपवले. बदनामी टाळण्यासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी आम्ही मृतदेह गुपचूप गावाकडे नेत होतो," असा दावा पालकांनी केला आहे.

पोलिस तपासाला वेग

हा प्रकार आत्महत्येचा आहे की घातपात, याचा तपास आता वाळूज एमआयडीसी पोलीस करत आहेत. पोलिसांनी संशयित सावत्र आई आणि वडिलांना ताब्यात घेतले आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सध्या संशयास्पद मृत्यूची नोंद करण्यात आली असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

Crime News
Crime News: "तू रोज येत जा, ५००० रुपये देईन..." सरपंचाच्या पतीची अल्पवयीन मुलीला अश्लील ऑफर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news