AIFF Film Festival 2026 | अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान आयोजन

Chhatrapati Sambhajinagar News | महोत्सवात भारतीय सिनेमा स्पर्धा विभागाचा समावेश, जगभरातील ७० फिल्म्सचे होणार प्रदर्शन
11th Ajanta Verul International Film Festival schedule
Ajanta-Ellora International Film Festival Pudhari
Published on
Updated on

11th Ajanta Verul International Film Festival schedule

छत्रपती संभाजीनगर : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणार्‍या अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आली आहे. बुधवार, दि. २८ जानेवारी ते रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान हा महोत्सव आयनॉक्स थिएटर प्रोझोन मॉल, छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे.

नाथ ग्रुप, एमजीएम विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण सेंटर प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा सुचना एवं प्रसारण मंत्रालय, भारत सरकार व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत असून प्रोझोन मॉल, कालिका स्टील व सॉलीटेअर टॉवर्स यांचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला मिळालेले आहे. एनएफडीसी व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तुती असणार आहे.

11th Ajanta Verul International Film Festival schedule
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election: प्रभाग १४ ड मध्ये काँग्रेस, एमआयएम, राष्ट्रवादी यांच्यात चुरशीची लढत

अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजनामागील उद्देश :

आजपर्यंतचे जागतिक दर्जाचे सर्वोत्त्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचावेत, चित्रपट दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलावंत व युवा पिढीतील सिनेमाची आवड असणार्‍या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळून कला व तांत्रिक पातळीवर चित्रपटाचे रसग्रहण होत चित्रपट जाणिवा अधिक सशक्त व समृद्ध व्हाव्यात, मराठवाडा व छत्रपती संभाजीनगरचे नाव चित्रपटाच्या निर्मितीच्या अंगाने सांस्कृतिक केंद्र म्हणून व प्रोडक्शन हब म्हणून जागतिक पातळीवर पोहोचावे, छत्रपती संभाजीनगर शहरातील पर्यटन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांपर्यंत पोहोचावे, मराठवाडा विभागातील गुणवंत कलावंतांना चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट विषयातील तज्ज्ञ व तंत्रज्ञांपर्यंत पोहोचता यावे, त्यांच्यासोबत संवाद साधता यावा तसेच आताचा मराठी सिनेमा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचावा, हा या महोत्सव आयोजनामागे उद्देश आहे.

भारतीय सिनेमा स्पर्धा :

महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. महोत्सवात मागील वर्षाप्रमाणे भारतीय स्पर्धा गटाचा समावेश करण्यात आलेला आहे. यात विविध भारतीय भाषांतील नऊ सिनेमांचा समावेश असून पाच राष्ट्रीय पातळीवरील ज्युरी हे प्रेक्षकांसह चित्रपट पाहणार आहेत. यातील सर्वोत्त्कृष्ट भारतीय चित्रपटाला सुवर्ण कैलास पारितोषिक व एक लक्ष रूपये देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट कलाकार (स्त्री/पुरुष) या वैयक्तिक पारितोषिकांचा देखील समावेश असणार आहे.

11th Ajanta Verul International Film Festival schedule
Chhatrapati Sambhajinagar : अधिकारी केबिनमध्ये : फेरीवाले थेट बसमध्ये

भारतीय सिनेमा स्पर्धा गट ज्युरी समितीचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ध्वनी संयोजक, ऑस्कर पुरस्कार विजेते पद्मश्री रसूल पुकूट्टी (कोचीन) हे असणार आहेत. तर ज्युरी सदस्य म्हणून ज्येष्ठ दिग्दर्शक अनिरूध्द रॉय चौधरी (कोलकाता), ज्येष्ठ संकलक आरती बजाज (मुंबई), ज्येष्ठ छायाचित्रणकार राफे मेहमूद (मुंबई) व ज्येष्ठ पटकथा लेखक उर्मी जुवेकर (मुंबई) हे मान्यवर असणार आहेत.

फिप्रेसी ही चित्रपट समीक्षकांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. फिप्रेसी भारत हे जगभरातील महोत्सवांमधून उत्तम चित्रपट निवडून त्यांना पुरस्कार प्रदान करतात. त्या पुरस्कारांना आंतरराष्ट्रीय सन्मान मानला जातो. त्यांचे तीन विशेष ज्युरी महोत्सवातील आताच्या पिढीतील ज्या दिग्दर्शकांच्या कारकिर्दीतील पहिले अथवा द्वितीय सिनेमे असणार आहेत त्यांचे विशेष परीक्षण करणार आहेत. या समितीचे ज्युरी अध्यक्ष ज्येष्ठ चित्रपट समीक्षक डॉ.सी.एस. व्यंकटीस्वरन (कोचीन) तर डॉ.मीनाक्षी दत्ता (दिब्रुगड) व एम.एम.व्हेट्टीकाड (नवी दिल्ली) हे मान्यवर या समितीत असणार आहेत.

11th Ajanta Verul International Film Festival schedule
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election | मनपाच्या 115 जागांसाठी 1870 उमेदवारी अर्ज दाखल

उद्घाटन सोहळा:

चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा बुधवार, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता रूक्मीणी सभागृह, एमजीएम परीसर, छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या प्रसंगी महोत्सवाचे मानद अध्यक्ष व प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर व ऑस्कर पुरस्कार विजेते प्रसिद्ध ध्वनी संयोजक पद्मश्री रसूल पुक्कूट्टी यांची उपस्थिती असणार आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मकदुम, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ.पी.एम.जाधव, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, महोत्सव संचालक सुनील सुकथनकर, महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, कालिका स्टीलचे अरूण अग्रवाल, प्रोझोनचे सेंटर डायरेक्टर व वरिष्ठ उपाध्यक्ष कमल आर. सोनी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर रात्री ९ वा. आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे यावर्षीची जागतिक पातळीवरील नावाजलेला व सध्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत असलेली स्पॅनिश/फे्ंरच भाषेतील, ऑलिव्हर लॅक्से दिग्दर्शित चित्रपट सिराट महोत्सवाचा उद्घाटकीय चित्रपट म्हणून प्रदर्शित केला जाणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर पुढील चार दिवस महोत्सव आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे संपन्न होईल.

समारोप सोहळा :

महोत्सवाचा समारोप सोहळा रविवार, दि. ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं. ५ वाजता आयनॉक्स प्रोझोन मॉल येथे संपन्न होणार आहे. प्रसिध्द दिग्दर्शक व निर्माते आनंद एल. राय व ऑस्कर विजेते साउंड डिझायनर रसूल पुक्कूट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप सोहळा संपन्न होईल.

सुवर्ण कैलास पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप यंदाच्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीतील महत्वपूर्ण चित्रपट प्रसिध्द दिग्दर्शक जफर पनाही दिग्दर्शित इट वॉज जस्ट अ‍ॅन अ‍ॅक्सिडेंड (फारसी) दाखविण्यात येणार आहे.

11th Ajanta Verul International Film Festival schedule
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election : संभाजीनगरात प्रमुख पक्षांची गोची

मास्टर क्लास व विशेष व्याख्यान :

महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत चित्रपट प्रदर्शनांबरोबरच विविध भरगच्च कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. गुरुवार, दि. २९ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे ‘मंजूमल बॉइज’ या प्रसिध्द सिनेमाचे युवा दिग्दर्शक चिदंबरम यांच्या समवेत विशेष संवाद आयोजित करण्यात आलेला आहे. दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग हे या सत्राचे संवादक असतील.

गुरूवार, दि. २९ जानेवारी २०२६ रोजी सायं ६ वा. आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे ‘मराठी चित्रपटांचा बदलता चेहरा’ या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाचे दिग्दर्शक, राष्ट्रीय पुरस्कार विजेते आशिष बेंडे, ‘साबरबोंडं’ या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहन कानवडे, चित्रपट निर्मात्या तन्मयी देव, फिल्मसिटीचे पंकज चव्हाण सहभागी होतील. चित्रपट समीक्षक व लेखक नम्रता फलके या सत्राच्या संवादक असतील.

शुक्रवार, दि. ३० जानेवारी २०२६ रोजी सायं. ६ वा. आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या समवेत विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ नाट्य-सिने दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हे या सत्राचे संवादक असतील.

11th Ajanta Verul International Film Festival schedule
Chhatrapati Sambhajinagar Politics | निवडणूक राष्ट्रवादी (अ. प.) लढणार 80 जागांवर

शनिवार, दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी. १२.३० वा. आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे ‘चित्रपट-संहिता ते प्रदर्शन’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ध्वनी संयोजक पद्मश्री रसूल पुकूट्टी, संकलक आरती बजाज, दिग्दर्शक अनिरूध्द रॉय चौधरी, छायाचित्रणकार राफे मेहमूद, पटकथा लेखक उर्मी जुवेकर हे सहभागी असतील. महोत्सव संचालक सुनील सुकथनकर या चर्चेचे संवादक असतील.

शनिवार, दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी सायं ६ वा. आयनॉक्स, भारतीय सिनेमा स्पर्धा गटातील चित्रपट दिग्दर्शकांसमवेत चर्चा आयोजित करण्यात आलेली आहे.

रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वा. आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे इंडिया फोकस या चित्रपट विभागातील दिग्दर्शकांसमवेत चर्चा आयोजित करण्यात आलेली आहे.

रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वा. आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे हिंदी सिनेमांचे प्रसिध्द निर्माते व दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्या मास्टरक्लासचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक जयप्रद देसाई हे त्यांच्या समवेत संवाद साधतील.

कलाकारांची उपस्थिती व संवाद :

स्पर्धा विभागातील सर्व प्रादेशिक चित्रपटांचे दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ञ महोत्सवात उपस्थित राहणार असून त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ते प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत.

11th Ajanta Verul International Film Festival schedule
Chhatrapati Sambhajinagar Water Issue : विजयनगरवासीयांचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष

मराठवाडा शॉर्ट फिल्म स्पर्धा :

महोत्सवाच्या निमित्ताने मराठवाड्यातील लघुपट निर्मिती करणार्‍या कलाकारांसाठी शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेला मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद लाभला. स्पर्धेतील अंतिम फेरीसाठी निवडलेल्या पाच शॉर्ट फिल्म महोत्सवादरम्यान दाखविण्यात येतील. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मला विशेष पारितोषिक व रोख २५,००० रूपये देऊन गौरविण्यात येणार आहे.

चित्रपट रसग्रहण कार्यशाळा :

चित्रपट महोत्सवामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा याकरिता छत्रपती संभाजीनगर शहरात पंचवीस महाविद्यालयांमध्ये चित्रपट रसग्रहण कार्यशाळांचे आयोजन चित्रपट समीक्षकांच्या उपस्थितीत दि. १३ ते २७ जानेवारी २०२६ दरम्यान करण्यात येणार आहे.

प्रतिनिधी नोंदणी :

चित्रपट महोत्सवास उपस्थित राहण्याकरीता प्रतिनिधी नोंदणीची सुरूवात करण्यात आलेली असून www.aifilmfest.in या वेबसाईटवर चित्रपट रसिकांना ऑनलाईन प्रतिनिधी नोंदणी करता येईल तर प्रत्यक्ष नोंदणी आयनॉक्स प्रोझोन मॉल, विशाल ऑप्टीकल्स (उस्मानपुरा व निराला बाजार) व निर्मिक ग्रुप, व्यंकटेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड येथे करता येईल.

11th Ajanta Verul International Film Festival schedule
Chhatrapati Sambhajinagar : उबाठाकडे आता १२ माजी नगरसेवकच शिल्लक

संयोजन समिती :

छत्रपती संभाजीनगरचे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणार्‍या या महोत्सवात मराठवाड्यातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा तसेच अधिक माहितीसाठी www.aifilmfest.in या वेबसाईटवर तसेच info@aifilmfest.in या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन महोत्सवाचे संस्थापक व संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम, मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर, सतीश कागलीवाल, महोत्सवाचे संचालक सुनील सुकथनकर, कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, डॉ. अपर्णा कक्कड, आकाश कागलीवाल, डॉ. आशिष गाडेकर, निमंत्रक नीलेश राऊत, महोत्सवाचे असोसिएट डायरेक्टर जयप्रद देसाई, ज्ञानेश झोटींग, डॉ. शिव कदम, डॉ. रेखा शेळके, प्रा.दासू वैद्य, डॉ. प्रेरणा दळवी, डॉ.आनंद निकाळजे, शिवशंकर फाळके, सुबोध जाधव, डॉ. कैलास अंभुरे, निखिल भालेराव, अमित पाटील, किशोर नरवडे, किशोर निकम, अजय भवलकर आदींनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news