

छत्रपती संभाजीनगर : मुख्य बसस्थानकासह सिडको बसस्थानकातील अधिकारी केबिनमध्ये बसण्यातच धन्यता मानत आहेत. इकडे मात्र फेरीवाले चक्क बसमध्ये व्यवसाय करत आहेत. दोन्ही बसस्थानकांत कॅमेऱ्यांचे जाळे पसरले असले तरी अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून प्रवाशांना वार्यावर सोडल्याचे चित्र दिसत आहे.
मुख्य बसस्थानकात चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरी प्रकरणी अनेकदा पोलिसांकडून फेरीवाल्यांकडे चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर फेरीवाल्यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्यात येत होते. फेरीवाल्यांना किंवा इतरांना बसमध्ये चढ्न व्यवसाय करता येत नाही.
नियमांचे उल्लंघन होत असेल तर त्यावर कारवई करण्याचे काम आगार प्रमुखासह बसस्थानक प्रमुखाचे आहे. असे असले तरी येथील आगार प्रमुखासह बसस्थानक प्रमुखाना केबिन सुटत नसल्याने फेरीवाले बिनधास्त बसमध्ये चढून व्यवसाय करत आहेत. येथील अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने प्रवाशांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
कॅमेरे बनले शोभेची वस्तू
दोन्ही बसस्थानकांत मिळून ९० च्या असपास कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांत बसस्थानकाचा कोपरा न कोपरा स्पष्ट दिसून येतो पाठवल्याची माहिती समोर आली असे असतानाही अधिकाऱ्यांना बसमध्ये चढलेले फेरीवाले दिसत नाही. हे एक आश्चर्यच आहे. कारण नुकताच त्यांनी फेरीवाले बसच्या बाहेरूनच व्यवसाय करत असल्याचा अहवाल वरिष्ठांना आहे.
...तर अधिकाऱ्यांवरही कारवाई - फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवणे तेथील आगार प्रमुख, बसस्थानक प्रमुखाचे काम आहे. फेरीवाल्यांना बसमध्ये चढण्याचा अधिकार नाही. अशा घटना घडत असतील तर संबंधित अधिकाऱ्यांवरही योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येत असेल तर फेरीवाल्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल.
प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक