Chhatrapati Sambhajinagar Crime : सहा महिन्यांच्या गर्भवतीने जीवन संपवले

जबरदस्तीने लिहून घेतला घटस्फोटाचा बॉन्ड : सासरच्या त्रासाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल ; पती, सासू, दिरासह ५ जणांवर सातारा पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhajinagar Crime
Chhatrapati Sambhajinagar Crime pudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : चारित्र्यावर संशय घेऊन केला जाणारा अमानुष शारीरिक-मानसिक छळ, सहा महिन्यांची गर्भवती असताना जालन्याला नेऊन बळजबरीने लिहून घेतलेला घटस्फोटाचा बॉन्ड आणि तुझे लग्न लहान दिराशी लावून देतो असे म्हणून सासरच्यांनी केलेली विटंबना... या असह्य जाचाला कंटाळून १९ वर्षीय विवाहितेने माहेरच्या घराच्या गच्चीवरून खाली उडी मारून मृत्यूला कवटाळले. ही हृदयद्रावक घटना सोमवारी (दि. २६) सातारा परिसरातील अलोक नगर येथे घडली.

घाटीत उपचारादरम्यान आधी २७ ऑक्टोबरला तिच्या पोटातील सहा महिन्यांचे बाळ दगावले, तर गुरुवारी (दि. २९) सकाळी विवाहितेचाही दुर्दैवी मृत्यू झाला. एकाच वेळी निष्पाप मातेसह पोटातील गर्भाचा अंत झाल्याने परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. सोनू विनोद राठोड (१९, रा. आलोक नगर, क्रीडा संकुलाजवळ, सातारा परिसर, मूळ रा. निरगुडी बुद्रुक, ता. खुलताबाद असे मत विवाहितेचे नाव आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Siddharth Tiger Death : पर्यटकांचे आकर्षण असलेला सिद्धार्थ वाघ काळाच्या पडद्याआड

याप्रकरणी आरोपी पती विनोद विलास राठोड, सासू सनिता, द्वीर विशाल, मावसा सभाष राठोड आणि मावशी पिनाबाई सुभाष राठोड (सर्व रा. मुकुंदनगर, मुकुंदवाडी) अशी आरोपींची नावे आहेत, पती विनोद आणि सास सनीता दोघांना अटक करण्यात आली असून १ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली.

फिर्यादी मृत सोनूचे वडील रमेश दासू चव्हाण (४०, रा. अलोकनगर) यांच्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी सोनू हिचा विवाह १२ जून २०२५ रोजी बोरगाव येथील कुबेर लॉन्समध्ये मुकुंदवाडी (५६ नंबर गेट, मुकुंदनगर) येथील विनोद राठोड याच्याशी झाला होता. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच पतीने तिच्या चारुियावर संशय घेण्यास सुरुवात केली.

पती विनोद, सासू सुनिता राठोड, दीर विशाल राठोड, मावसा सुभाष राठोड आणि मावशी पिनाबाई राठोड यांनी २० ऑगस्ट रोजी तिला मारहाण व शिवीगाळ केली. त्यावेळी वडील रमेश चव्हाण यांनी नातेवाईकांसह सासरी जाऊन समजूत काढली असता, त्यांनी चूक मान्य करत सोनूला महिनाभर नीट वागवले.

पोटातील बाळासह मातेचा करुण अंत

गंभीर जखमी झालेल्या सोनूला वडिलांनी तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू असताना, २७ ऑक्टोबर रोजी तिच्या पोटातील सहा महिन्यांचे बाळ दगावले. त्यानंतर मृत्यूशी झुंज देणाऱ्या सोनूचीही प्रकृती खालावत गेली आणि अखेर २९ ऑक्टोबर रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. गुन्ह्याचा पढील तपास सहायक निरीक्षक शैलेश देशमख करत आहेत.

कोजागरीच्या मध्यरात्री वाद अन् गच्चीवरून उडी

२५ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमेच्या रात्री ११ वाजता पती विनोद हा साताऱ्यातील घरी आला. रात्री उशिरापर्यंत गप्पा मारल्यानंतर तो १२:३० वाजता निघून गेला आणि पुन्हा रात्री १:३० वाजता माहेरी परत आला. सोनू, तिचा पती विनोद आणि लहान बहीण मोनू हे तिघे घराच्या गच्चीवर बसून बोलत होते. पहाटे ४ वाजेच्या सुमारास सोनू आणि पती विनोद यांच्यात पुन्हा कडाक्याचे भांडण सुरू झाले.

वाद विकोपाला गेल्याने लहान बहीण मोनू ही खाली झोपलेल्या वडिलांना उठवण्यासाठी धावली. ती खाली पोहोचते न पोहोचते, तोच गच्चीवरून जोरात काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला. कुटुंबीयांनी घराबाहेर धाव घेतली असता, सोनू ही रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेली दिसली. पतीच्या सततच्या संशय आणि मानसिक त्रासाला कंटाळून तिने गच्चीवरून थेट खाली उडी घेतली होती.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Chhatrapati Sambhajinagar Groundwater Crisis : जिल्ह्यातील भूजल पातळी ५.४० मीटरने घटली; डिसेंबरमध्येच आटणार बोअरवेल

गर्भवती असताना घटस्फोटाचा बॉन्ड; दिराशी लग्नाची भाषा

सोनू सहा महिन्यांची गरोदर राहिली. असे असताना ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सासरच्या मंडळींनी जालन्याला काम आहे, असे सांगून तिला सोबत नेले आणि तेथे दबाव आणून तिचा व पती विनोदचा घटस्फोटाचा नोटरी बॉन्ड तयार करून घेतला. एवढ्यावरच न थांबता, आता तुझे लग्न तुझा लहान दीर विशाल विलास राठोड याच्यासोबत लावून देतो, अशी विटंबना तिची सासू सुनिता व मावसा सुभाष यांनी केली. त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी पतीने तिला पुन्हा बेदम मारहाण केल्याने, तिची दयनीय अवस्था पाहून वडिलांनी तिला माहेरी आणले. तरीही पती विनोद हा दर दोन दिवसांआड तिला भेटण्यासाठी माहेरी येत असे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.