Chhatrapati Sambhajinagar Groundwater Crisis : जिल्ह्यातील भूजल पातळी ५.४० मीटरने घटली; डिसेंबरमध्येच आटणार बोअरवेल

सर्वाधिक पैठण ७.१५, खुलताबाद ६.०२ आणि कन्नड ६.१८ मीटरने पाणी पातळी खालावल्याने स्थिर भूजल पातळी तब्बल १२ मीटर खोल गेली आहे.
groundwater level,
groundwater level,file photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात यंदाच्या मान्सूनात पावसाचे प्रमाण अतिशय कमी राहिले आहे. त्यामुळे भूजल पाणी पातळी चिंताजनक स्थितीत पोहचली आहे. मागील पाच वर्षांच्या सरासरी स्थिर भूजल पातळीच्या तुलनेत सप्टेंबरच्या परीक्षणनुसार भूजल पातळ तब्बल ५.४० मीटरने खालावली आहे. यात सर्वाधिक पैठण ७.१५, खुलताबाद ६.०२ आणि कन्नड ६.१८ मीटरने पाणी पातळी खालावल्याने स्थिर भूजल पातळी तब्बल १२ मीटर खोल गेली आहे. त्यामुळे डिसेंबरमध्येच बहुतांश गावांतील बोअरवेल आणि विहिरी अटण्यास सुरुवात होणार आहे.

जिल्ह्यात दरवर्षी भूजल पाणी पातळी मोजण्यात येते. त्यासाठी जिल्ह्यात परीक्षण विहिरी निश्चित केल्या आहेत. त्यानुसार भूजल सर्वेक्षण विभागाकडून पाणी पातळी तपासण्यात येते. यंदाही सप्टेंबरमध्ये ही प्रक्रिया राबविण्यात आली. या भूजल पातळीच्या तुलनात्मक अहवालातून जिल्ह्यात येत्या काही दिवसांत अनेक गावांमध्ये पाणीबाणीची समस्या निर्माण होण्याचे संकेत मिळत आहे.

groundwater level,
Sambhajinagar Senior Citizen Fraud : वृद्ध महिला भामट्यांच्या निशाण्यावर ; एकाच दिवशी दोघींना लुबाडले

कमी पावसामुळे छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, पैठण, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड आणि सोयगाव या नऊ तालुक्यांमध्ये मागील पाच वर्षांची सरासरी आणि सप्टेंबरमध्ये करण्यात आलेल्या भूजल पाणी पातळी निरीक्षण अहवालातील आकडेवारीशी तुलना करण्यात आली. त्यात प्रत्येक तालुक्याची भूजल पातळीत कमालीची घट झाली असल्याची माहिती अहवालातून दिसून आली आहे. विशेष म्हणजे, तीन तालुक्यांमध्ये ही घट १२ मीटरवर गेली आहे.

तालुकानिहाय आकडेवारीनुसार पैठण आणि कन्नड तालुक्यांमध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे. त्यापाठोपाठ खुलताबाद, सिल्लोड तालुक्याचा समावेश आहे. गंगापूर आणि छत्रपती संभाजीनगरची भूजल स्थिती समाधानकारक नसल्याचे अहवालातून स्पष्ट होते.

groundwater level,
Sambhajinagar Water Shortage : सिल्लोडच्या जलसाठ्यांवर अवैध उपशाचे संकट

मागील पाच वर्षांच्या सप्टेंबर महिन्यातील सरासरी भूजल पातळी ४.४८ मीटर होती. यंदा सप्टेंबर २०२६ मध्ये ती ९.८७ मीटरपर्यंत गेली आहे. म्हणजेच मागील पाच वर्षांच्या तुलनेत यावेळी पावसाळ्यानंतर भूजल पातळी सरासरी ५.४० मीटरने खोल गेली आहे. भूजल पातळी जेवढी खोल जाते, तेवढ्या लवकर विहिरी आणि बोअरवेल आटण्यास सुरुवात होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.