छत्रपती संभाजीनगर: आठ ट्रकमधून १३१ म्हशींची तस्करी; ३ म्हशींचा गुदमरून मृत्यू

२ कोटींचा मुद्देमाल जप्त; पिशोर पोलिसांची कारवाई
Pishore police action at Chh. Sambhajinagar
पिशोर पोलिसांनी आठ ट्रक जप्त करून म्हशींना गोशाळेत सोडण्यात आले. Pudhari News Network
Published on
Updated on

पिशोर, पुढारी वृत्तसेवा : आठ ट्रकमधून १११ म्हशी नेल्या जात होत्या. याबाबतची माहिती मिळाल्यावर पिशार पोलिसांनी ही वाहने थांबवून म्हैशींची सुटका केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत २ कोटी ७ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जत करण्यात आला. बुधवारी (दि.३) सकाळी ही कारवाई करण्यात आली.

Pishore police action at Chh. Sambhajinagar
शिवीगाळ करू नको म्हटल्याने बेघर व्यक्तीस पेट्रोल टाकून पेटवले | छ. संभाजीनगरमध्ये दोघांना अटक

खडकी पुलाजवळ सापळा लावून कारवाई

सिल्लोड कडून कन्नडकडे आठ ट्रकमधून जनावरांची तस्करी केल्या जात असल्याची माहिती पिशोर पोलीस ठाण्याचे सपोनि शिवाजी नागवे यांना मिळाली होती. नागवे यांनी उपनिरीक्षक ढगारे, जमादार वसंत पाटील, विलास सोनवणे, सुनील भिवसने, दत्ता लोखंडे, लगड, कन्हाळे, अन्सार पटेल, सोनवणे, पणन खामाट आदींच्या पथकाद्वारे खडकी पुलाजवळ सापळा लावला.

Pishore police action at Chh. Sambhajinagar
'ॲथर'ची राज्यात गुंतवणूक; छ. संभाजीनगरात प्लांट उभारणार - फडणवीस

काही वेळात सिल्लोडकडून एकामागे एक अशा आठ आयशर वाहने येत असल्याने पाहून पथक सतर्क झाले. ही सर्व वाहने पोलिसांनी थांबवली. सदरील वाहनांच सपोनि नागवे आणि पोलीस कर्मचारी यांनी तपासणी केल्यावर प्रत्येक ट्रकमध्ये दाटीवाटीने उभ्या असलेल्या म्हशी दिसाल्या. याबाबत चालकांना विचारणा केली असता सिल्लोड कडून कन्नडमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जनावरे नेत असल्याने त्यांनी सांगितले.

Pishore police action at Chh. Sambhajinagar
छ. संभाजीनगर: जरांगेंना विरोध केल्याने डॉ. रमेश तारख यांच्या तोंडाला काळे फासले

सर्व आठ चाहनांतून सुमारे १३० म्हशी तसेच एक रेडा अशी जनावरे खाली उतरविण्यात आली. यातील तीन म्हशींचा गुदमरल्याने मृत्यू झाला. तर सात गंभीर जखमी अवस्थेत होत्या. तसेच आणखी अनेक म्हैशी जखमी अवस्थेत दिसून आल्या.

Pishore police action at Chh. Sambhajinagar
छ. संभाजीनगर: पैठण येथे रूग्णालयात गळफास घेऊन रुग्णाने जीवन संपविले

आठ वाहने पिशोर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली

आठ वाहने पिशोर पोलीस ठाण्यात आणून जमा करण्यात आली. मध्यप्रदेशमधील बरहाणपूर येथून छत्रपती संभाजीनगर येथील कारखान्यात या म्हशी नेल्या जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आयशर (एम एच २४९ ए यु २६२५) चालक एम मनीष अहिरवाल (वय ३१, काली बावडी, जि. धार), आयशर (सी, जी, ०४ एन डब्लू ८८०३) चालक मुस्तकीम मुकीम खान (वय २५, रा. इमरानी, जि. खरगोन), आयकर (एम एस १८ बी एच ५११६) चालक संजयखान फिरोजखान (वय २८, जि. खरगोन), आयशर (एम एच १८ बी एच ०७०७) चालक रमजानखान छोटेखान (वय २६, रा. बाळसमंद जि. खरगोन), फिरोजखान छोटेखान (वय ३५, रा. बाळसमंद, जि. खरगोन) आयशरचा (एम एच १८ बी जी ८५१४) चालक जुनेद खान रियान खान (वय २१, रा. बाळसमंद जि. खरगोन), आयशरचा (एम एच १८ बी एच ५०९८) चा चालक इम्रान अल्लाउद्दीन पटेल (वय २८, रा. जळगाव, ह. मु. संजयनगर) आदींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरा पर्यंत सुरु होती.

Pishore police action at Chh. Sambhajinagar
छ. संभाजीनगर : शाळा सुरू असतानाच शिक्षकाला लागली डुलकी; व्हिडिओ व्हायरल

पळशी येथील गोशाळेत जनावरे

पोलिसांनी सर्व वाहने सिल्लोड तालुक्यातील पळशी गावाकडे वळवली. तेथे श्री गणेश गोशाळेत ही जनावरे सोडण्यात आली. गोशाळेकडून या जनावरांची काळजी घेण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news