शिवीगाळ करू नको म्हटल्याने बेघर व्यक्तीस पेट्रोल टाकून पेटवले | छ. संभाजीनगरमध्ये दोघांना अटक

शंभुनगरातील घटना जवाहरनगर पोलिसांनी तिघांना केली अटक
Attempt to burn a person alive in Sambhajinagar
छ. संभाजीनगरात व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न Pudhari File Photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : फुटपाथवर झोपलेल्या बेघर व्यक्तीस रेकॉर्डवरील आरोपीने चक्क अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये झोपलेली व्यक्ती गंभीररित्या भाजली असून त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. मंगळवारी (दि.2) रात्री साडेदहा वाजता शंभुनगरातील त्रिशरण चौकात ही घटना घडली. या प्रकरणी जवाहरनगर येथील आदिल शाहरूख शेख (वय.19), कृष्णा समाधान शिंदे (वय.20) आणि शेख अय्याज शेख मुमताज (वय.30) तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिली.

या प्रकरणात महिपालसिंग रणधीरसिंग गौर (वय. 57, रा. हनुमाननगर चौक रोड, तिरुपती पार्क, गुरुसहानीनगर, त्रिशरण चौक, शंभुनगर) हे गंभीर भाजले असून त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार, दोन वर्षांपासून त्यांचे पत्नीसोबत वाद सुरू आहेत. त्यामुळे ते बेघर झाले असून शंभुनगरात एका दुकानासमोर फूटपाथवर अधिवास करतात. रेकॉर्डवरील आरोपी आदिल हा मंगळवारी रात्री साडेआठ वाजता महिपालसिंग यांच्याकडे बसलेल्या ठिकाणी गेला. मद्यधुंद अवस्थेतील आदिलने महिपाल यांना दारू पाजली.

Attempt to burn a person alive in Sambhajinagar
Delhi Fire |घराला आग लागून एकाच कुटुंबातील ४ जणांचा होरपळून मृत्यू

दरम्यान आदिल शिवीगाळ करीत असल्याने गौर यांनी त्याला तेथून जाण्यास सांगितले. त्यामुळे आदिलला राग आला. तो तेथून गेला पण, रात्री साडेदहा वाजता साथीदार कृष्णा शिंदे याला सोबत घेऊन पुन्हा आला. यावेळी त्याने सोबत बाटलीत पेट्रोल आणले होते. महिपाल झोपलेले आहेत पाहुन त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि पेटवून दिले. आगीचा दाह लागल्याने गौर यांना जाग आली. त्यांनी बचावासाठी आरडाओरड केली. तेव्हा आदिल आणि कृष्णा पसार झाले. नागरिकांनी गौर यांच्या अंगावर पाणी आणि कपडे टाकत त्यांना वाचविले. नागरिकांनीच त्यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले.

Attempt to burn a person alive in Sambhajinagar
शॉर्टसर्किटची आग टाळण्यासाठी…

जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

घटनेची माहिती मिळाल्यावर जवाहरनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी तत्काळ तेथे पथक पाठविले. घाटीत जाऊन महिपालसिंग यांचा जबाब नोंदविला. त्यावरून जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल केला. विशेष पथकाचे उपनिरीक्षक मारोती खिल्लारे, अंमलदार गजेंद्र शिंगणे, संदीप क्षीरसागर आणि गुन्हे शाखेच्या पथकाने पसार झालेले आरोपी आदील शेख, कृष्णा शिंदे आणि त्यांना पेट्रोल देणारा शेख अय्याज या तिघांनाही अटक केली. अधिक तपास उपनिरीक्षक खिल्लारे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news