छ. संभाजीनगर: जरांगेंना विरोध केल्याने डॉ. रमेश तारख यांच्या तोंडाला काळे फासले

झुंजार छावा संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांचे कृत्य
Dr. Ramesh Tarakh
झुंजार छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी डॉ. रमेश तारख यांच्या तोंडाला काळे फासले. Pudhari News Network
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांना ४ जूनरोजी अंतरवाली सराटीत उपोषणास बसण्यास विरोध केल्याप्रकरणी डॉ. रमेश तारख यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले आहे. आज (दि.२४) दुपारी डॉ. तारख यांच्या रुग्णालयात जाऊन झुंजार छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे फासले.

Dr. Ramesh Tarakh
छत्रपती संभाजीनगर : विद्युत मोटर जोडताना विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

डॉ. रमेश तारख यांच्या तोंडाला काळे का फासले?

  • मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटीतील उपोषणाला विरोध

  • झुंजार छावा संघटनेचे कार्यकर्ते संतप्त

  • रुग्णालयात जाऊन डॉ. रमेश तारख यांच्या तोंडाला फासले काळे

Dr. Ramesh Tarakh
छ. संभाजीनगर: पैठणमध्ये वेगवेगळ्या घटनेत २ जणांचा मृत्यू

डॉ. तारख यांच्या विरोधात मराठा संघटनांचा नाराजीचा सुरू

जरांगे यांच्या उपोषणामुळे अंतरवाली सराटीत वाहतुकीचा त्रास होतो. असे कारण देत, डॉ. तारख यांनी जरांगे यांच्या विरोधात जालना पोलीस आयुक्तालयात निवेदन दिले होते. तेव्हापासून डॉ. तारख यांच्या विरोधात मराठा संघटनांचा नाराजीचा सुरू होता. दरम्यान, संघटनेचे पदाधिकारी डॉ. तारक भेटण्यासाठी गेले. अगोदर सत्कार तारख यांचा सत्कार व त्यानंतर त्यांच्या तोंडाला काळे फासले. यानंतर जरांगे यांच्या आंदोलनास विरोध कराल तर याद राखा, अशी ताकीद त्यांना संघटनेकडून देण्यात आली.

Dr. Ramesh Tarakh
छ. संभाजीनगर: ब्राम्हणगाव येथे ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने १२० जनावरांची सुटका

याप्रकरणी झुंजार छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील कोटकर म्हणाले, उपोषणाला का विरोध करताय, याबाबत डॉ. तारख यांच्याशी चर्चा केली. चर्चेदरम्यान लक्षात आले की, तारख हे मराठा समजाविरोधी भूमिका घेत आहेत. यामुळे त्यांच्या तोंडाला काळे फासे आहे, असे कोटकर यांच्याकडून सांगण्यात आले. काही काळापूर्वी डॉ. तारख यांना जरांगे यांचे जवळचे सहकारी मानले जात होते. मात्र, मागील चार महिन्यांपासून जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध करत असल्यामुळे हा प्रकार घडला, असे बोलले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news