

पैठण, पुढारी वृत्तसेवा: घनसावंगी तालुक्यातील पांडुळी येथे आक्षेपार्ह मजकूर समाज माध्यमावर व्हायरल केल्याच्या निषेधार्थ आज (दि.७) विहामांडावा, हिरडपुरी येथील व्यापार पेठ बंद ठेवून निषेध करण्यात आला. या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
घनसावंगी तालुक्यातील पांडुळी येथील एका युवकाने समाज माध्यमावर एका समाजाबद्दल आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला होता. त्यामुळे भावना दुखावणाऱ्या या युवकाविरुद्ध विहामांडावा हिरडपुरी येथील सर्व व्यवहार बंद ठेवून योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, सपोनि संतोष माने, पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवाल, पोलीस जमादार किशोर शिंदे, बालोदे, अभिजीत सोनवणे, ताराचंद धडे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
हेही वाचा