

Abhijeet Dipke Mother Reaction: भारतीय राजकारणात गेल्या १२ वर्षात जे झालं नाही ते आज २५ जून रोजी घडून आलं आहे. केंद्र सरकारच्या एखाद्या मंत्र्याने जनरेटा पाहून राजीनामा देण्याची ही पहिलीच घटना घडली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी कॉक्रोज जनता पार्टीने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर आज धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे.
या गेल्या महिन्यात दोन महिन्याच्या संघर्षानंतर अखेर अभिजीत दिपकेच्या आंदोलनला यश आलं. यानंतर अभिजीत दिपके यांची आई अनिता दिपके यांनी डोळ्यात आनंदाश्रू आणत प्रतिक्रिया दिली. त्यांनी माझ्या लेकराचा विजय झाला हे सांगताना त्याने बॉस्टनवरून आल्यापासून काय काय सोसलं याचा देखील पाढा वाचला.
अनिता दिपके या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, 'मला खूप आनंद झाला आहे. त्याला चापट खावी लागली, त्याच्यावर शाई फेकली गेली. नाहीत्या ठिकाणी त्याला झोपावं लागलं. डासांमध्ये झोपावं लागलं. आज त्याचा खूप मोठा विजय झाला आहे.'
त्यांना तुमच्या डोळ्यात अश्रू का असे विचारले असता त्यांनी हे आनंदाश्रू आहेत असं सांगितलं. माझ्या लेकराचा आज मोठा विजय झाला आहे. त्याला टॉयफॉईड झालाय. या सगळ्या परिस्थितीतून त्याने विजय मिळवला आहे. आम्ही रात्रभर झोपत नव्हतो. माझ्या लेकराचं काय होणार काय नाही ही चिंता होती मात्र आज खूप छान वाटत आहे.'
आपल्या लेकराच्या संघर्षाबाबत बोलताना आई म्हणाल्या की, माझ्या लेकराच्या कष्टाचे चीज झाले. गेल्या अडीत महिन्यापासून काहीच नाही. जसा तो बॉस्टनवरून आला आहे तसा तो या आंदोलनातच आहे. आज तो सगळ्या टेन्शनमधून मोकळा झाला.